प्रतिनिधी / वास्का
चिरकोन उडी बेलाबाय वास्को येथील रस्त्यावर आलेला माड अखेर कापण्यात आल्याने धोका दूर झाला आहे. या मार्गावर बऱयाच वर्षांपासून हा धोका होता. सदर धोकादायक माड कापण्यात यावा अशी मागणी नागरिकांकडून होत असे. नुकताच हा माड कापून धोका दूर करण्यात आला. बेलाबाय चिरकोन उडी येथून मेस्तावाडामार्गे थेट बायणाला जोडणाऱया रस्त्यावरील चिरकोन उडी येथील अगदी वळणावर हा धोकादायक माड होता. हा माड अगदी रस्त्यावर आल्याने तेथून जाणारी वाहने या माडाला आदळण्याचा धोका निर्माण झाला होता. त्यामुळे अपघात घडण्यापूर्वीच तो माड कापण्यात यावा अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून होत असे. या मागणीची दखल घेऊन स्थानिक नगरसेवीका रोचना बोरकर यांनी सदर माड कापून धोका दूर करण्याची जबाबदारी पार पाडली. बेलाबाय येथील साकवाखालील जमीनीत रेल्वेने मातीचा भराव घातल्याने तेथील नाल्यात माती पसरली होती. त्यामुळे पावसाळय़ात पाणी तुंबण्याची भिती निर्माण झाली होती. सदर नाल्यातील माती काढून तो नाला साफ करण्यात आल्याची माहिती नगरसेविका रोचना बोरकर यांनी दिली.