वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
वाहनांचे सुट्टेभाग बनविणाऱया कंपन्यांसाठी उत्पादनावर आधारीत प्रोत्साहान(पीएलआय) योजनेंतर्गत आगामी पाच वर्षात 7.5 लाख अतिरिक्त रोजगार आणि उत्पादनात 2,31,500 कोटी रुपयांची वृद्धी होणार असल्याची शक्यता सांगितली जात आहे.
या संदर्भात अवजड उद्योग मंत्रालयाचे सचिव अरुण गोयल यांनी माहिती देताना म्हटले आहे, की आम्ही ज्या 20 कंपन्यांना वाहन क्षेत्रातील पीएलआय योजनेसाठी 45,000 कोटी रुपयांपेक्षा अधिकची गुंतवणूक होण्याची शक्यता आहे. आम्ही योजनेतून 25,938 कोटी रुपये तसेच याच्यासाठी 2,31,500 कोटी रुपये मूल्याचे उत्पादन वाढणार असल्याचेही सचिवांनी स्पष्ट केले.
प्रोत्साहन योजनेतील पात्र कंपन्या
वाहनांसाठी सुट्टेभाग बनविणाऱया कंपन्यांसाठी घोषणा करण्यात आलेल्या पीएलआय योजनेच्या माध्यमातून फोर्ड, टाटा मोर्ट्स, सुझुकी, हय़ुंदाई, किया आणि महिंद्रा ऍण्ड महिंद्रा यांच्यासह 20 कंपन्यांनी प्रोत्साहन योजनेचा लाभ मिळवण्यासाठी पात्रता सिद्ध केली आहे.
देशात मेड इन इंडियावर भर ः सचिव अरुण गोयल
सदरच्या योजनेतून देशभरात आगामी काळात ‘मेड इन इंडिया’ अंतर्गत भारतातच उत्पादनाला प्रोत्साहन देण्यात येणार असून यामध्ये सुक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योगांचा सामवेश होणार असल्याचे सचिव अरुण गोयल यांनी नमूद केले.