शमशेरा या चित्रपटातून लवकरच भेटणार
स्वतःच्या उत्तम अभिनयामुळे चाहत्यांची मने जिंकणारी अभिनेत्री वाणी कपूरने आता पडद्यावर दमदार अभिनय करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. आगामी चित्रपट शमशेरा यासाठी अत्यंत योग्य ठरणार असल्याचे तिचे म्हणणे आहे.
शमशेरा एक नाटय़मय अनुभव असून लवकरच हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट देशभरात सर्व लोकांची मने जिंकेल अशी आम्हाला अपेक्षा आहे. शमशेरा चित्रपट निर्माण करण्यासाठी प्रत्येकाने स्वतःचे सर्वोत्तम योगदान दिले आहे. ‘चंदीगढ करे आशिकी’नंतर चाहत्यांना पसंत पडेल अशी भूमिका साकारण्याचा माझा प्रयत्न आहे. स्क्रीनवर दमदार भूमिका साकारण्याची माझी इच्छा पूर्ण करण्यासाठी शमशेरा हा चित्रपट उत्कृष्ट मार्ग असल्याचे तिने म्हटले आहे.
हा चित्रपट यशराज फिल्म्सकडून निर्माण करण्यात आला आहे. चित्रपटात रणवीर कपूर मुख्य भूमिकेत असून संजय दत्त देखील यात दिसून येणार आहे. करण मल्होत्रांचे दिग्दर्शन असलेला हा चित्रपट 1800 सालच्या काळावर बेतलेला आहे. यात आदिवासी स्वतःच्या अधिकार आणि स्वातंत्र्यासाठी इंग्रजांशी लढताना दिसून येणार आहेत. हा चित्रपट 22 जुलै रोजी हिंदी, तमिळ आणि तेलगू भाषेत प्रदर्शित होणार आहे.