उडुपी/प्रतिनिधी
कोरोना निगेटिव्ह अहवाल असणाऱ्या विद्यार्थ्यांना एमआयटी कॅम्पसमधून बाहेर पडण्याची परवानगी असल्याचे आरोग्य मंत्र्यांनी म्हंटले आहे. कर्नाटकचे आरोग्य व वैद्यकीय शिक्षणमंत्री के. सुधाकर मंगळवारी आणि बुधवार या दोन दिवसात उडुपी आणि दक्षिण कन्नड जिल्ह्यांना भेटी देणार आहेत. दरम्यान मंत्री सुधाकर यांनी कोरोना नकारात्मक अहवाल असलेल्या मणिपाल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (एमआयटी) च्या विद्यार्थ्यांना लवकरच कॅम्पस बाहेर पडण्यास परवानगी देण्यात येईल असे ते म्हणाले.
“मणिपाल (अकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन) च्या परिसरात ११ हजार लोक आहेत. जवळपास ९०० लोकांना (एमआयटी मध्ये) संसर्ग झाला आहे. त्यानंतर संपूर्ण कॅम्पसला कंटेनमेंट झोन घोषित करण्यात आले आहे. नकारात्म अहवाल असल्याने कोणतेही गंभीर धोका नसल्यामुळे आम्ही या विद्यार्थ्यांना परत पाठवत आहोत. जिल्हा प्रशासनाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार सोमवारी एकट्या एमआयटीत गेल्या १४ दिवसांत ८५५ प्रकरणे नोंदली गेली आहेत.