प्रतिनिधी/ बेळगाव
अनुसूचित जाती-जमातीला निवडणुकीमध्येही कायद्याने आरक्षण दिले पाहिजे. विधानपरिषदेमध्ये आरक्षण आहे. त्यानुसार बेळगाव जिह्यामधून मल्लेश चौगुले यांना विधानपरिषदेची उमेदवारी द्यावी, अशी मागणी जय भीम बहुजन युवा संघ यांच्यावतीने जिल्हाधिकाऱयांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
अनुसूचित जाती-जमातीचा विकास व्हायचा असेल तर प्रत्येक क्षेत्रात आरक्षण राहिलेच पाहिजे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जी घटना लिहिली आहे त्या घटनेनुसार आम्हाला आरक्षण द्यावे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्येही आरक्षण दिलेच पाहिजे. तेव्हा या आरक्षणामधूनच मल्लेश चौगुले यांना विधानपरिषदेची उमेदवारी द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
यावेळी संघटनेचे अध्यक्ष यल्लाप्पा कांबळे, उपाध्यक्ष पांडुरंग कांबळे, सेपेटरी कृष्णा पिरगण्णावर, रवी कागणकर, शंकर कांबळे, देवाप्पा कांबळे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते..