प्रतिनिधी / कोल्हापूर
राज्यातील सहा विधान परिषदेसाठी निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. त्यामुळे सर्वच पक्ष तयारीला लागले आहेत. यात भाजप व महाविकास आघाडी अशी लढत रंगण्याची चीन्हे आहेत. यापार्श्वभुमीवर राजकिय नेत्यांनी भेटी गाटी सुरु केल्या असुन जिल्ह्याचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी नुकतीच माजी खासदार राजू शेट्टी यांची त्यांच्या शिरोळ येथील निवासस्थानी भेट घेतली आहे. विधानपरिषद रणधुमाळीत स्वाभिमानीची भुमिका ही महत्त्वाची ठरणार असल्यााचे ओळखत सतेज पाटील यांनी ही भेट घेतली आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात विधान परिषदेचे वारे वाहू लागल्याने जिल्ह्यातील मातबर उमेदवार रिंगणात उतरणार आहेत. त्याचबरोबर विजय आपलाच होणार असल्याचा दावा करत आहेत. त्याचबरोबर भाजपची आखणी होण्यापुर्वी सतेज पाटील यांनी भेटीगाटीला वेग दिल्यामुळे या लढतींकडे सर्वाचे लक्ष असणार आहे. यावेळी कोल्हापूर शहर अध्यक्ष सचिन चव्हाण, सावकर मादनाईक, सागर शंभू शेटे, शैलेश आडके, राम शिंदे, शैलेश चौगुले हे उपस्थित होते.
कोल्हापूर विधान परिषदेसाठी रंगणार पाटील विरुद्ध माजी आमदार महादेव महाडिक अशी लढत
राज्यातील विधान परिषदेच्या निवडणुकांची तारीख गेल्या काही दिवसांपुर्वी 9 नोव्हेंबर रोजी जाहीर झाल्या आहेत. कोल्हापूर विधान परिषद निवडणूक रणधुमाळी सुरू झाली आहे. या रणधुमाळीत महाविकास आघाडीच्या वतीने काँग्रेस नेते आणि पालकमंत्री सतेज पाटील हे मैदानात उतरणार असून त्यांच्याविरोधात भाजपचा उमेदवार कोणीही असला तरी पुन्हा एकदा जिल्ह्यात पाटील विरुद्ध माजी आमदार महादेव महाडिक गटात संघर्ष रंगणार आहे.