प्रतिनिधी/ वडूज
राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक माजी केंद्रीय कृषीमंत्री शरदराव पवार यांच्या वाढदिवसानिमित्त खटाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने विविध विधायक कार्यक्रम राबविण्यात आले.
पंचायत समितीच्या बचत सभागृहात रक्तदान शिबीर, सहविचार बैठक, व्हच्युअर सभा आदी कार्यक्रम झाले. या कार्यक्रमास जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष प्रदिप विधाते, नियोजन समितीचे माजी सदस्य नंदकुमार मोरे, माजी सभापती संदिप मांडवे, पंचायत समितीच्या सभापती जयश्री कदम-पाटील, प्रा. अर्जुनराव खाडे, जितेंद्रदादा पवार, तालुकाध्यक्ष बाळासाहेब जाधव, माजी उपसभापती बाळासाहेब माने, शशिकला देशमुख, राजेंद्र कचरे, विजय काळे डॉ. संतोष देशमुख, नगरसेवक संदिप गोडसे, तुकाराम यादव, प्रमिला पाटोळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
मायणी येथील मेडीकल कॉलेजच्या ब्लड बँकेच्या वतीने आयोजित केलेल्या रक्तदान शिबीरास रक्तदात्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला. श्री. रायबोळे व सहकार्यांनी शिबीराच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले. यावेळी दरजाईचे सरपंच संतोष बोटे, गुरसाळेचे माजी सरपंच महादेव जाधव, शशिकांत माने, शिवाजी दुबळे, शिवाजीराव साबळे, विष्णू निकम, ज्ञानेश्वर जगताप, ज्ञानेश्वर शिंदे, सोमनाथ साठे, सचिन मालगावे, रविंद्र सुर्यवंशी, आप्पासाहेब पवार, शरद कदम, योगेश जाधव, आरिफ मुलाणी, आशा बरकडे, सौ. जाधव आदी उपस्थित होते.