सिव्हिल हॉस्पिटलमध्ये केले एमआरआय
प्रतिनिधी / बेळगाव
जि.पं. सदस्य योगीशगौडा खूनप्रकरणी सीबीआयने अटक केलेले माजी मंत्री विनय कुलकर्णी (वय 52) यांची सोमवारी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे. न्यायालयाच्या आदेशावरून त्यांची तपासणी झाली आहे.
एमआरआय चाचणीसाठी विनय कुलकर्णी यांनी न्यायालयात अर्ज दाखल केला होता. त्यानुसार कारागृहातील डॉक्टरांनी सोमवारी पोलीस बंदोबस्तात एमआरआयसाठी त्यांना सिव्हिलला पाठविले.
सिव्हिल हॉस्पिटलमध्ये त्यांची प्राथमिक वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्यानंतर एमआरआय करून पुन्हा त्यांना कारागृहात नेण्यात आले. यासंबंधी हिंडलगा मध्यवर्ती कारागृहातील वरि÷ अधिकाऱयांशी संपर्क साधला असता न्यायालयाच्या आदेशावरून सिव्हिल हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय तपासणी केल्याचे अधिकाऱयांनी सांगितले.
15 जून 2016 रोजी सप्तापूर-धारवाड येथील जीममध्ये जि. पं. सदस्य योगीशगौडा यांचा भीषण खून झाला होता. रियल इस्टेट व्यवहारातून हा खून झाल्याचे सांगण्यात आले होते. 6 सप्टेंबर 2019 रोजी हे प्रकरण सीबीआयकडे सोपविले होते. सीबीआय अधिकाऱयांनी 5 नोव्हेंबर 2020 रोजी विनय कुलकर्णी यांना अटक केली. सध्या हिंडलगा मध्यवर्ती कारागृहात त्यांना स्थानबद्धतेत ठेवले आहे.