आरसीबीचा 37 धावांनी दमदार विजय, चेन्नईचा संघ पाचव्यांदा पराभूत
वृत्तसंस्था/ दुबई
कर्णधार विराट कोहलीने चौफेर फटकेबाजीचा झंझावात साकारल्यानंतर रॉयल चॅलेंजर्स बेंगळूर संघाने चेन्नई सुपरकिंग्सविरुद्ध आयपीएल साखळी सामन्यात 37 धावांनी सहज विजय संपादन केला. आरसीबीने 20 षटकात 4 बाद 169 धावांची मजल मारली. विराटने 52 चेंडूतच 90 धावांची आतषबाजी केली. त्याच्या या तडाखेबंद खेळीत 4 चौकार व तितक्याच षटकारांचा समावेश राहिला. त्यानंतर प्रत्युत्तरात चेन्नईला 20 षटकात 8 बाद 132 धावांपर्यंत पोहोचता आले.
विराटने नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आणि फलंदाजीला उतरल्यानंतर तो निर्णय स्वतः सार्थ करुन दाखवला. दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवरील या लढतीत सलामीवीर ऍरॉन फिंचला (2) मध्यमगती गोलंदाज दीपक चहरने त्रिफळाचीत केले. पण, त्यानंतर तिसऱया स्थानी फलंदाजीला उतरणाऱया विराटने झुंजार खेळी साकारत डोळय़ांचे पारणे फेडले.
शार्दुल ठाकुरने 11 व्या षटकात 2 बळी घेण्यापूर्वी विराट व देवदत्त पडिक्कल (33) यांनी तिसऱया गडय़ासाठी 53 धावांची भागीदारी साकारली. पुढे, शार्दुलने देवदत्तला प्लेसिसकरवी झेलबाद केले व त्याच षटकात एबी डीव्हिलियर्सला धोनीकरवी तंबूचा रस्ता दाखवला.
डीव्हिलियर्सचा ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न फसल्यानंतर चेंडूने बॅटची कड घेतली. विराटने मात्र उत्तम जम बसवत जबरदस्त फटकेबाजी केली. मैदानाच्या चौफेर फटकेबाजी करत त्याने चेन्नई गोलंदाजांच्या मर्यादा स्पष्ट केल्या. वॉशिंग्टन सुंदर 10 धावांवर बाद झाल्यानंतर शिवम दुबेने 14 चेंडूत 2 चौकार व एका षटकारासह जलद, नाबाद 22 धावांचे योगदान दिले. विराट-दुबे या जोडीने 5.3 षटकातच 76 धावांची अभेद्य भागीदारीही साकारली. गोलंदाजीत शार्दुलने 2 बळी घेतले असले तरी त्याला 4 षटकात 40 धावा मोजाव्या लागल्या. याशिवाय, दीपक चहर व सॅम करण यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
धावफलक
रॉयल चॅलेंजर्स बेंगळूर : देवदत्त पडिक्कल झे. डय़ू प्लेसिस, गो. ठाकुर 33 (34 चेंडूत 2 चौकार, 1 षटकार), ऍरॉन फिंच त्रि. गो. चहर 2 (9 चेंडू), विराट कोहली नाबाद 90 (52 चेंडूत 4 चौकार, 4 षटकार), एबी डीव्हिलियर्स झे. धोनी, गो. शार्दुल 0 (2 चेंडू), वॉशिंग्टन सुंदर झे. धोनी, गो. करण 10 (10 चेंडूत 1 चौकार), शिवम दुबे नाबाद 22 (14 चेंडूत 2 चौकार, 1 षटकार). अवांतर 12. एकूण 20 षटकात 4 बाद
169.
गडी बाद होण्याचा क्रम : 1-13 (फिंच, 2.5), 2-66 (देवदत्त पडिक्कल, 10.2), 3-67 (डीव्हिलियर्स, 10.5), 4-93 (वॉशिंग्टन, 14.3).
गोलंदाजी : दीपक चहर 3-0-10-1, सॅम करण 4-0-48-1, शार्दुल ठाकुर 4-0-40-2, डेव्हॉन ब्रेव्हो 3-0-29-0, कर्ण शर्मा 4-0-34-0, रविंद्र जडेजा 2-0-7-0.
चेन्नई सुपरकिंग्स : शेन वॅटसन त्रि. गो. वॉशिंग्टन सुंदर 14 (18 चेंडूत 3 चौकार), फॅफ डय़ू प्लेसिस झे. मॉरिस, गो. वॉशिंग्टन सुंदर 8 (10 चेंडू), अम्बाती रायुडू त्रि. गो. उदाणा 42 (40 चेंडूत 4 चौकार), एन. जगदीशन धावचीत (मॉरिस) 33 (28 चेंडूत 4 चौकार), महेंद्रसिंग धोनी झे. गुरकिरत, गो. चहल 10 (6 चेंडूत 1 षटकार), सॅम करण झे. डीव्हिलियर्स, गो. मॉरिस 0 (1 चेंडू), रविंद्र जडेजा झे. गुरकिरत, गो. मॉरिस 7 (6 चेंडूत 1 चौकार), डेव्हॉन ब्रेव्हो झे. पडिक्कल, गो. मॉरिस 7 (5 चेंडू), दीपक चहर नाबाद 5 (5 चेंडू), शार्दुल ठाकुर नाबाद 1 (1 चेंडू). अवांतर 5. एकूण 20 षटकात 8 बाद
132.
गडी बाद होण्याचा क्रमः 1-19 (प्लेसिस, 3.6), 2-25 (वॅटसन, 5.4), 3-89 (जगदीशन, 14.2), 4-106 (धोनी, 15.6), 5-107 (सॅम करण, 16.2), 6-113 (रायुडू, 17.3), 7-122 (ब्रेव्हो, 18.4), 8-126 (जडेजा, 18.6)
गोलंदाजी : ख्रिस मॉरिस 4-0-19-3, नवदीप सैनी 4-0-18-0, उदाणा 4-0-30-1, वॉशिंग्टन सुंदर 3-0-16-2, यजुवेंद्र चहल 4-0-35-1, शिवम दुबे 1-0-14-0.