माहेश्वरी अंधशाळेच्या विद्यार्थ्यांचे योग स्पर्धेत यश
![](https://tarunbharat.com/wp-content/uploads/2021/06/21di-62-768x1024.jpg)
बेळगाव : आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त केएलई कंकणवाडी आयुर्वेदीक हॉस्पिटलतर्फे आयोजित योग स्पर्धेत माहेश्वरी अंधशाळेच्या विद्यार्थ्यांनी यश संपादन केले आहे. सदर स्पर्धेत विविध शाळांतील अनेक विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता. त्यामध्ये माहेश्वरी अंधशाळेच्या विद्यार्थ्यांनीही भाग घेतला होता. अक्षता संगटी हिने द्वितीय व प्रतीक तुरमुरी याने तृतीय क्रमांक पटकाविला. या यशाबद्दल प्रभाकर नागरमुन्नोळी, संस्थेचे पदाधिकारी, मुख्याध्यापिका अनिता गावडे, शाळेचा शिक्षकवर्ग यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. शाळेचे क्रीडाशिक्षक शिरीष सांबरेकर व के. मल्लाप्पा यांचे मार्गदर्शन लाभले.
संत मीरा शाळा
अनगोळ येथील संत मीरा इंग्रजी स्कूलमध्ये आंतरराष्ट्रीय योगदिन मोठय़ा उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापिका सुजाता दप्तरदार होत्या.
संत मीराच्या सभागृहात योग दिवसाचे औचित्य साधून योगासनाची प्रात्यक्षिके व महत्त्व योग शिक्षिका अनुराधा पुरी यांनी पटवून दिले. प्रारंभी सुजाता दप्तरदार, उपमुख्याध्यापिका ऋतुजा जाधव, सहशिक्षिका गीता वर्पे, आशा कुलकर्णी, विनाश्री तुक्कार, सुजाता पाटील यांच्या हस्ते भारत माता, सरस्वती ओमकार यांच्या प्रतिमेचे पूजन करून दीपप्रज्वलन करण्यात आले. अनुराधा पुरी व सी. आर. पाटील यांनी योगाची प्रात्यक्षिके करून शिक्षकांकडून करवून घेतली. जनकल्याण ट्रस्टचे सदस्य कृष्णा भट्ट, श्रीकांत कदम, आनंद कालिंगण्णावर यांच्या हस्ते गणेश पूजन, सरस्वती पूजन, संत मीराबाई यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आले. आरती व मंत्र म्हणून कार्यक्रमाची सांगता झाली.
योग केल्याने शरीर निरोगी बनते : मराठी विद्यानिकेतनमध्ये योग दिन उत्साहात
![](https://tarunbharat.com/wp-content/uploads/2021/06/21di-66-1024x577.jpg)
आपली जीवनशैली उत्कृष्ट हवी असेल तर आपल्या आयुष्यात योगाचा समावेश करणे गरजेचे आहे. योग केल्यामुळे आपले शरीर नेहमी निरोगी आणि सुदृढ राहते. निरोगी आरोग्यामुळे आपण आनंदी राहू शकतो, असे विचार क्रीडाशिक्षक दत्ता पाटील यांनी मांडले.
मराठी विद्यानिकेतनच्या सभागृहात योग दिनानिमित्त ते बोलत होते. ते पुढे म्हणाले, दररोज तासभर योगासाठी दिला तर शारीरिक व मानसिक समतोल राहतो. अनेक रोगांवर नियंत्रण मिळवित एकाग्रता साधता येते.
आंतरराष्ट्रीय योग दिन मराठी विद्यानिकेतन शाळेमध्ये मोठय़ा उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी शिक्षकांकडून प्रात्यक्षिके करून घेण्यात आली. शाळेचे मुख्याध्यापक आय. व्ही. मोरे, प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक जी. व्ही. सावंत, शिक्षकवर्ग उपस्थित होता. सहशिक्षक धीरजसिंग रजपूत यांनी आभार मानले.
पतंजलीतर्फे विविध ठिकाणी योगदिन
![](https://tarunbharat.com/wp-content/uploads/2021/06/21di-60-1024x768.jpg)
पाटीदार भवन-शास्त्राrनगर येथे सकाळी 6 ते 7 या वेळेत आंतरराष्ट्रीय योग दिन आचरण्यात आला. कोरोना महामारीच्या संकटातून सर्व जगाची सुटका व्हावी, तसेच सर्वांना उत्तम आरोग्य प्राप्त व्हावे, या हेतूने नियमितपणे पहाटे 5 ते 6 या वेळेत होमहवन करण्यात आले.
यावेळी मगनभाई पटेल, बाबुभाई पटेल, किरण मन्नोळकर, पुरुषोत्तम पटेल, मोहन बागेवाडी उपस्थित होते. जोतिबा भादवणकर यांनी यावेळी मार्गदर्शन केले. कोरोनाचे नियम पाळत मोजक्मयाच योगप्रेमींना घेऊन हा कार्यक्रम झाला. याचे ऑनलाईन प्रसारणही करण्यात आले. त्यामुळे अनेकांनी घरामध्ये मोबाईलद्वारेच योगदिन साजरा केला.
संपूर्ण जगाला योगशिवाय पर्याय नाही. कोरोनासारख्या असंख्य आजारांना योग हाच पर्याय आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी व बाबा रामदेव यांनी संपूर्ण जगाला दिलेली योग ही अमूल्य देणगी आहे, असे विचार यावेळी किरण मन्नोळकर यांनी मांडले.
बेळगावातील जैन कॉलेज, बी. के. मॉडेल हायस्कूल, विजयनगर येथील संत मीरा स्कूल, शिंदोळी येथील भरतेश पॉलिटेक्निक कॉलेज, एस. एस. मिरजी कॉलेज इत्यादी ठिकाणी पतंजलीतर्फे हा दिवस साजरा करण्यात आला. शांतीपाठाने कार्यक्रमांची सांगता झाली.
सिव्हिलच्या कोरोना वॉर्डमध्ये पीपीई किट घालून प्रात्यक्षिक
![](https://tarunbharat.com/wp-content/uploads/2021/06/21di-67-1024x768.jpg)
आंतरराष्ट्रीय योगदिनाच्या पार्श्वभूमीवर सोमवारी सिव्हिल हॉस्पिटलमधील कोरोना वॉर्डमध्येही कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. बिम्समधील नर्सिंग कॉलेजच्या राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) शाखेच्यावतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
डॉक्टरांनी पीपीई किट घालून योगाची प्रात्यक्षिके केली. कोरोना बाधितांनाही या महामारीतून बाहेर पडण्यासाठी योग किती साहाय्यभूत आहे, याची माहिती देण्यात आली. नर्सिंग कॉलेजमधील विद्यार्थ्यांनीही या कार्यक्रमात भाग घेतला.
मच्छे येथील माजी सैनिक संघटना : माजी सैनिक संघटनेच्यावतीने योगदिन साजरा करण्यात आला.
![](https://tarunbharat.com/wp-content/uploads/2021/06/21di-31-1024x768.jpg)
आंतरराष्ट्रीय योगदिनाच्या पार्श्वभूमीवर माजी सैनिक संघटनेच्यावतीने मच्छे येथे योगदिन साजरा करण्यात आला. माजी सैनिक संघटनेचे पदाधिकारी, सदस्य व त्यांच्या कुटुंबीयांनी कार्यक्रमात भाग घेतला. निवृत्त सुभेदार परशराम देसाई यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी नारायण नावगेकर, नामदेव पाटील, भोमाणी डोळेकर, पुंडलिक बाळेकुंद्री आदी उपस्थित होते.
कोरोनामुळे घरातच योगसाधना : लोकप्रतिनिधी-अधिकाऱयांनीही केली योगासने
![](https://tarunbharat.com/wp-content/uploads/2021/06/1-131-1024x424.jpg)
गेल्या काही वर्षांमध्ये भारत देशामध्येच नव्हे तर संपूर्ण जगामध्ये योगदिन मोठय़ा उत्साहात साजरा होत आहे. कारण योगसाधनेमुळे आरोग्य चांगले राहते. योगाचे अनेक फायदे असल्यामुळे आता प्रत्येकजण योगाकडे वळला आहे. 21 जून हा आंतरराष्ट्रीय योगदिन म्हणून साजरा केला जातो. त्यानुसार विविध मंत्री, खासदार, आमदार यांसह अधिकाऱयांनी योग करून हा दिन साजरा केला. महत्त्वाचे म्हणजे कोरोनामुळे घरातच किंवा परिसरात योग करून हा दिन साजरा करण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार जनतेनेही योग दिन कोरोनाचे नियम पाळत साजरा केला.
अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री उमेश कत्ती, खासदार मंगला अंगडी, जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांच्यासह इतर आमदार व अधिकाऱयांनी योग साधना केली.
दरवषी योगदिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. मात्र, कोरोनामुळे प्रत्येकाने घरातच योगदिन साजरा केला. योग दिनानिमित्त अनेकांनी मार्गदर्शनही केले. योग करा आणि आजारांना पळवून लावा. कोरोनाकाळात तर याचे महत्त्व आणखी वाढले आहे. कारण योग करणारी व्यक्ती कोरोनावर मात करू शकते, असे अनेक जाणकारांचे म्हणणे आहे. त्यामुळे यावषीचा योग दिन अत्यंत मनापासून साजरा करण्यात आला.