क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव
युनियन जिमखाना आयोजित मोहन मोरे पुरस्कृत मोहन मोरे बेळगाव प्रीमियर लीगच्या सहाव्या आवृत्तीत चंदन कुंदरनाड हे दुसरे संघमालक ठरले आहेत. चंदन हे विश्रुत चिट्स प्रायव्हेट लिमिटेड व द पीपल्स पेडिट सौहार्द सहकारी नियमित या संस्थेचे सीईओ आहेत.
मोहन मोरे बेळगाव प्रीमियर लीगच्या सहाव्या आवृत्तीत चंदन कुंदरनाड यांचा संघ विश्रुत स्ट्रायकर्स या नावाने मैदानात उतरणार आहे याआधीच्या बीपीएलच्या आवृत्तीत चंदन यांच्या विश्रुत स्ट्रायकर्स संघाने उपविजेतेपद पटकावले होते. कोणत्याही क्रीडा स्पर्धेसाठी हातभार लावणारे चंदन हे सामाजिक कार्यात सुद्धा अग्रेसर असतात. युनियन जिमखाना संचालक संजय चव्हाण यांनी पुष्पगुच्छ देऊन चंदन कुंदरनाड यांचे स्वागत केले. यावेळी विकास देसाई, बसवराज मोतीमठ, युनियन जिमखाना अध्यक्ष चंद्रकांत बांडगी, सचिव प्रसन्ना सुंठणकर व संचालक सुभाष कुलकर्णी उपस्थित होते.
मार्चच्या पहिल्या आठवडय़ात सुरू होणाऱया बीपीएल स्पर्धेत एकूण 32 सामने होणार असून स्पर्धा 17 दिवस चालणार आहे