सलग 11 दिवस होणार स्पर्धा, एकूण 48 संघांचा सहभाग
प्रतिनिधी /येळ्ळूर
सुळगे (ये) येथे हाफपिच क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेचे उद्घाटन रविवार दि. 27 रोजी विधान परिषदचे सदस्य चन्नराज हट्टीहोळी यांनी फीत कापून केले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एपी युवा मंचचे संस्थापक अरविंद पाटील होते.
उद्घाटनापूर्वी स्पर्धेचे लॉट्स काढण्यात आले. या स्पर्धेमध्ये 48 संघांनी भाग घेतला असून सामन्यांचे प्रसारण यु-टय़ूबवरही करण्यात येणार आहे. या स्पर्धेसाठी साडेचार फुटी ट्रॉफी विजेत्या व उपविजेत्या संघासाठी देण्यात येणार आहे. उद्घाटन कार्यक्रमाचे प्रास्ताविक बी. बी. पाटील यांनी केले. बुडाचे माजी अध्यक्ष युवराज कदम, डॉ. संपत पाटील, उद्योजक अभिमन्यू डागा, उद्योजक जयवंत बाळेकुंद्री, चेतन बुद्धन्नावर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीला जोतिबा दोड्डमनी यांनी पुष्पहार अर्पण केला. हालगा ग्रा. पं. अध्यक्ष गणपत मारीहाळकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढविण्यात आले. सुळगा ग्रा. पं. अध्यक्ष गंगव्वा नाईक व ग्रा. पं. सदस्या यमुनाताई पाटील यांनी पूजन केले. पद्मराज पाटील आणि सराफ शांताराम येळ्ळूरकर यांच्या हस्ते विठ्ठल-रखुमाईचे पूजन करण्यात आले. चषक अनावरण सुजय जाधव अनगोळ, पीडीओ दुर्गाप्पा तहशिलदार, जोतिबा थोरवत यांच्या हस्ते करण्यात आले. यष्टीपूजन येळ्ळूर ग्रा. पं. अध्यक्ष सतीश पाटील, समाजसेवक विलास चौगुले, उमेश पाटील यांनी केले.
माजी सैनिक मारुती होनगेकर, प्रकाश पाटील, मोहन नावगेकर, पवन पाटील, पी. एन. पाटील, पी. जी. येळ्ळूरकर, पी. जी पाटील, के. एन. पाटील, सिद्धाप्पा छत्रे, लक्ष्मण पाटील, नेमाणी चौगुले, विकास कुकडोळकर, अरविंद कपाडिया, बी. एन. पाटील, ग्रा. पं. माजी व विद्यमान सदस्य अरविंद पाटील यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. खेळपट्टीचे उद्घाटन आमदार चन्नराज हट्टीहोळी यांनी केल्यानंतर त्यांनी तरुणांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बी. बी. पाटील यांनी केले. पी. जी. पाटील यांनी आभार मानले. सामन्यांचे समालोचन युवराज जाधव करीत आहेत. एकूण 11 दिवस सामने खेळविले जाणार आहेत.
मंगळवारचे सामने : 1) बॅडबॉईज दांडेली विरूद्ध आयो-आयो कडोली, सायं. 7 वा., 2) आबा वानखेडे, कोल्हापूर वि. सोनोली वॉरियर्स, रात्री 8 वा, 3) डीएसपी सनसेट वॉरियर्स पिरनवाडी वि. मंगलमूर्ती (बी) मच्छे. रात्री 9 वा., 4) पहिल्या व दुसऱया सामन्यातील विजयी संघ, रात्री 10 वा., 5) साई स्पोर्ट्स बस्तवाड वि. तिसऱया सामन्यातील विजयी संघ, रात्री 11 वा.