क्रीडा प्रतिनिधी /मडगाव
बेलग्रेड (सर्बिया) येथे होणाऱया एलिट पुरूषांच्या विश्व बॉक्सिंग स्पर्धेत गोव्याच्या लॅनी दी गामा यांची मूल्यांकनकर्ता आणि निरीक्षक म्हणून निवड करण्यात आली आहे. विश्व बॉक्सिंग संघटनेने त्यांना त्यांच्या नियुक्तीचे पत्र पाठविले आहे.
बेलग्रेडमध्ये या स्पर्धेचे आयोजन 24 ऑक्टोबर ते 6 नोव्हेंबर या कालावधीत होणार आहे. स्पर्धा पुरूष आणि महिला विभागात होणार असून 13 वजनी गटातील प्रथम तीन विजेत्यांना भरघोस रकमेची बक्षिसे देण्यात येतील.