दीड दिवसाच्या ‘श्री ’ विसर्जनासाठी दहा ठिकाणी येणार वाहन : भाविकांना लाभ घेण्याचे आव्हान
![](https://tarunbharat.com/wp-content/uploads/2021/09/ASHOK-1024x614.jpg)
प्रतिनिधी /बेळगाव
कोरोनाचा फैलाव वाढत चालल्याने गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्याचे आवाहन शासनाच्यावतीने करण्यात आले आहे. तसेच शक्मयतो दीड ते पाच दिवसांत गणेश विसर्जन करण्याची सूचना करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर दीड दिवसाच्या विसर्जनाकरिता शुक्रवार दि. 10 आणि शनिवार दि. 11 रेजी गणेशमूर्ती विसर्जनाकरिता फिरत्या वाहनाची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे.
दरवर्षी महापालिका, प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि विविध स्थानिक संस्थाच्यावतीने पाचव्या दिवशी विसर्जनाकरिता फिरत्या वाहनांची सुविधा उपलब्ध करण्यात येते. पण यंदा शुक्रवार दि. 10 रोजी व शनिवार दि. 11 रोजी दीड दिवसाच्या गणेश विसर्जनाकरिता महापालिकेने फिरत्या वाहनाची व्यवस्था करून विसर्जनाची सुविधा उपलब्ध केली आहे. सध्या कोरोनाचा प्रसार होत असल्याने विसर्जनाच्या ठिकाणी गर्दी होवू नये याकरिता आवश्यक खबरदारी घेण्यात आली आहे. दि.11 रोजी विविध भागात फिरते वाहन उपलब्ध राहणार असल्याने भाविकांनी याचा लाभ घेवून श्री मुर्ती विसर्जन करून पर्यावरणाच्या रक्षणासह आरोग्याची काळजी घ्यावी असे आवाहन महापालिका आयुक्त रूद्रेsश घाळी यांनी केले आहे. खालील ठिकाणी दिलेल्या वेळेत फिरते वाहन उपलब्ध राहणार आहे. तसेच मनपाच्या कर्मचाऱयाची नियुक्ती करण्यात आली असून अडचण भासल्यास संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.