बेळगाव : दाणे गल्ली शहापूर येथील वीर मदकरी गर्जना संघातर्फे गरजूंना जीवनावश्यक साहित्याचे वाटप करण्यात आले. नुकत्याच झालेल्या कार्यक्रमात 500 गरजू कुटुंबीय व रिक्षाचालकांना जीवनावश्यक किटचे वाटप करण्यात आले. जिल्हय़ात अनलॉक जारी करण्यात आला असला तरी अद्याप परिस्थिती पूर्वपदावर आली नाही. त्यामुळे वीर मदकरी संघटनेचे राज्य अध्यक्ष आनंद शिरूर यांनी जीवनावश्यक किट वितरणाचे काम सुरू ठेवले आहे. यावेळी गरजूंना जीवनावश्यक किट मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले.
याप्रसंगी आकाश करोशी, किरण पाटील, संजय देशपांडे, उमेश होसूर, अजय तिळवे, आदित्य पुजारी यांसह कार्यकर्ते उपस्थित होते.