वेंगुर्ले/ वार्ताहर-
नगरविकास विभागाकडील दि. 02/09/2021 रोजीच्या पत्रान्वये नगरपरीषदेला प्राप्त झालेल्या ई लिलावाच्या अटी व शर्तीमध्ये बदल करण्याबाबतच्या शासन निर्देशानुसार नगरपरीषदेमार्फत राबविण्यात येत असलेल्या वेंगुर्ले नगरपरीषद मालकीच्या सागररत्न मत्स्य बाजारपेठ या इमारतीच्या तळमजल्यावरील 15 दुकान गाळयांसाठीची ई लिलाव प्रक्रियेतील अट क्रमांक 5 मध्ये बदल करण्यात आलेला आहे. त्यामुळे शुक्रवारी दि. 3 रोजी लिलाव भरण्याची असलेली मुदत आणखी 3 दिवस म्हणजे 6 सप्टेंबरपर्यत वाढविली आहे. तसेच एका गाळ्यांसाठी जी 51 हजार रूपये भरणा करावयाची होती. ती एकादाच 51 हजार रूपये भरून 1 गाळा किंवा आवश्यक ते गाळे किंवा 15 हि गाळ्यांसाठी एकदाच ती रक्कम भरून लिलाव प्रक्रियेत सहभाग घेण्याची संधी निर्माण झाली आहे. याचा नागरीक व व्यापाऱ्यांनी लाभ घ्यावा. असे आवाहन नगराध्यक्ष दिलीप गिरप यांनी केले आहे.
वेंगुर्ले नगरपरीषद मालकीच्या सागररत्न मत्स्यबाजारपेठ या इमारतीच्या तळमजल्यावरील 15 दुकान गाळयांसाठीची ई लिलाव प्रक्रिया दि. 20/08/2021 ते 07/09/2021 या दरम्यान प्रस्तावित आहे. या ई लिलावाच्या अटी व शर्तीमध्ये बदल करण्याबाबतचे शासन निर्देश नगरविकास विभागाकडील दि. 02/09/2021 रोजीच्या पत्रान्वये नगरपरीषदेला प्राप्त झालेले असल्याने नगरपरीषदेमार्फत राबविण्यात येत असलेल्या वरील लिलावाच्या अट क्रमांक 5 मध्ये बदल करण्यात आलेला आहे.
त्यामुळे ज्या नागरीकांना ई लिलावामध्ये भाग घ्यावयाचा आहे. त्यांना आता केवळ 1000/- रुपये लिलाव फी व 50,000/- अनामत रक्कमेचा केवळ एक वेळच भरणा करुन 15 हि गाळयांच्या ई लिलावामध्ये भाग घेता येणार आहे. त्यासाठी त्यांनी रुपये 1000/- व रुपये 50,000/- अशा केवळ दोन धनाकर्षाचे फोटो अपलोड करुन त्यांनी सर्व 15 अथवा ते इच्छुक असणाऱ्या गाळयांच्या लिलावामध्ये स्वतंत्रपणे भाग घ्यावयाचा आहे. केवळ 51,000/- रुपये भरुन नागरीकांना सर्व अथवा त्यांना हव्या असणाऱ्या गाळयांच्या ई लिलावासाठी पात्र करण्यात येईल.
जुन्या गाळेधारकांना देखील केवळ रुपये 1000/- लिलाव फी व 50,000/- अनामत रक्कम असून त्यांना प्राप्त झालेल्या 1st Right to Refusal चा अधिकार सर्व 15 अथवा त्यांना हव्या असणाऱ्या गाळयांकरीता वापर करता येणार आहे. परंतु त्यांनी त्या सर्व गाळयांच्या ई' लिलाव प्रक्रियेमध्ये भाग घेणे आवश्यक आहे. तसेच ई लिलाव प्रक्रियेमध्ये भाग घेण्याकरीता अर्ज सादर करण्याची मुदत 3 दिवसांनी म्हणजेच 06/09/2021 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत वाढविण्यात येत असून प्रत्यक्ष
ई’ लिलाव दि. 07/09/2021 रोजी संकेतस्थळावर दिलेल्या वेळेनुसार पार पडतील. जास्तीत जास्त नागरीकांना ई लिलाव प्रक्रियेमध्ये भाग घेणे शक्य होणेकरीता वरीलप्रमाणे ई लिलाव प्रक्रियेच्या अटी व शर्तीमध्ये सुधारणा करण्यात येत आहे. तरी बदल केलेल्या अटींचा लाभ घेवून जास्तीत जास्त नागरीकांनी या `ई’ लिलाव प्रक्रियेमध्ये भाग घ्यावा असे आवाहन नगराध्यक्ष दिलीप गिरप यांनी केलेले आहे.