वार्ताहर / वेंगुर्ले:
आरोग्य व स्वच्छतेविषयी जनजागृती व्हावी तसेच कोरोनाच्या जागतिक महासंकटावर मात करण्यासाठी आत्मविश्वास, मनोबल वाढावा, या उद्देशाने रोटरी क्लब वेंगुर्ले मिडटाऊन पुरस्कृत रोटरॅक्ट व इंटरॅक्ट क्लब होमिओपॅथीक मेडिकल कॉलेज यांनी विविध संदेश देणारी ध्वनिचित्रफित बनविली आहे.
यात शासकीय सूचना पाळा, आरोग्य सेतू ऍप वापरा, हात वारंवार धुवा, मास्क वापरा, सॅनिटाइजरचा योग्यरितीने वापर करा, योग्य समतोल आहार घ्या, योगासने व व्यायाम करा, प्राणायाम करा, रोगप्रतिकारक शक्ती वाढवा, घरी रहा- सुरक्षित रहा, सोशल डिस्टंन्सिंग पाळा, असे विविध प्रकारचे रोगप्रतिबंधक लोकजागृतीचे संदेश दिले आहेत.
ऍड. दत्ता पाटील होमिओपॅथीक मेडिकल कॉलेज रोटरॅक्ट व इंटरॅक्ट क्लबचे स्वप्नील परब, निहाल नाईक, श्रुती शेडगे, स्नेहल भोईर, सिद्धी चव्हाण, स्मिता पाटील, श्रावणी तुळसकर, बेरमनी गुडल्ला, रिझवान बोबडे, दत्तप्रसाद पवार, योगेश सांळुखे, दुर्गेश पाटील, सिद्धी बोबाटे, श्वेता खरात, निकीता रावराणे, ईशा सावंत, कोमल जगाडे, सर्जील करजीकर सदस्यांनी यात सहभाग घेतला आहे.
‘मुस्कुरायेगा इंडिया, जितेगा इंडिया’ या ध्वनिचित्रफितीद्वारे जनजागृती करण्यात आले आहे. या ध्वनिचित्रफितीची निर्मिती व संकल्पना रोटरॅक्ट प्रेसिडेंट स्वप्नील परब, संदेश निर्मिती सेपेटरी श्रुतिका शेडगे यांची असून व्हाईस प्रेसिडेंट निहाल नाईक व इंटरॅक्ट प्रेसिडेंट सर्जिल कर्जीकर यांनी सहाय्य केले आहे.