वेंगुर्ले /वार्ताहर-
साहस प्रतिष्ठान, सिंधुदुर्ग या वेंगुर्लेतील संस्थेच्या चौथ्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून आयोजित केलेल्या कार्यक्रमांत दिव्याग बंधू-भगिनीचा नवीन शौर्य दिव्याग बचत गटाची' स्थापना करण्यात आली. वेंगुर्लेत काल सोमवारी साहस प्रतिष्ठान, सिंधुदुर्ग या संस्थेच्या चौथ्या वर्धापन संस्थेच्या कार्यालयात संस्थेचे अध्यक्षा सौ. रूपाली पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. दिव्याग बंधू-भगिनीचा नवीन शौर्य दिव्याग बचत गटाची स्थापना करण्यात आली. यावेळी संस्थेचे विश्वस्त ज्योती मडकईकर, नगरपरीषद वेंगुर्लेचे सहाय्यक प्रकल्प अधिकारी विलास ठुंबरे व समुदाय संघटक अतुल अडसूळ या मान्यवराbचा समावेश होता. यावेळी दिव्याग बंधू-भगिनीचा नवीन स्थापन करण्यांत आलेल्या
शौर्य दिव्याग बचत गटहा राष्ट्रीय व राज्य नागरी उपजीविका अभियान अंतर्गत नगरपरीषद वेंगुर्लेस जोडण्यात आल्याची माहिती प्रतिष्ठानच्या अध्यक्षा सौ. रूपाली पाटील यांनी देत,
दिव्याग बंधू-भगिनींचा सर्वांगीण विकास न्याय व हक्क यासाठी कटिबध्द’, हे ब्रीदवाक्य उराशी बाळगून सतत कार्यरत असणारी हि संस्था. हितचिंतकांच्या व देणगी दात्यांच्या सहकार्याने अविरत सुरू आहे. दिव्याग बाधवाप्रती सर्व कर्तव्य निष्ठेने पार पाडत आहे. आम्हास साथ हवी सन्मानाची जिद्द भरारी घेण्याची असेही त्यांनी स्पष्ट केले.