प्रतिनिधी /बेळगाव
वैश्यवाणी महिला मंडळाच्या 32 व्या वर्धापनदिनानिमित्त तिळगुळ समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमामध्ये सन 2022-23 वर्षासाठी नूतन कार्यकरिणीची निवड करण्यात आली.
नूतन कार्यकारिणी मंडळाच्या अध्यक्षा उज्ज्वला बैलूर, उपाध्यक्षा मनीषा हणमशेट, जयश्री हणमशेट, सुनीता बापसेट, खजिनदार अश्विनी कलघटगी, उपखजिनदार प्रणाली कपिलेश्वरी, सचिव लक्ष्मी बिडीकर, उपसचिव अक्षता कलघटगी यांची एकमताने निवड करण्यात आली. मावळत्या अध्यक्षा शीला बिडीकर व सचिव वर्षा सटवाणी यांनी नवीन कार्यकारी मंडळाच्या सदस्यांना पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
सल्लागार कमिटीमध्ये शीला बिडीकर, वर्षा सटवाणी, शीतल कुडतुरकर, निर्मला कणबर्गी, मंजुषा देवलापूरकर यांची निवड करण्यात आली. या कार्यक्रमावेळी महिलांसाठी विविध स्पर्धा घेण्यात आल्या. विजेत्या महिलांना बक्षिसांचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनीता हणमशेट यांनी केले. अहवाल वाचन अश्विनी कलघटगी यांनी केले. यावेळी महिला मोठय़ा संख्येने उपस्थित होत्या.