प्रतिनिधी /बेळगाव
जितो लेडीज विंगतर्फे शिलाई मशीन व वॉटर प्युरिफायर भेट देण्यात आला. भरतेश एज्युकेशन ट्रस्टमधील ‘अनोखी लेडीज क्लब’ला चार शिलाई मशीन भेट देण्यात आल्या. यावेळी जितो लेडीज विंगच्या अध्यक्षा अरुणा शहा उपस्थित होत्या.
गरजू महिलांना शिवणक्लास शिकवून त्यांना स्वयंरोजगारासाठी प्रेरणा दिली जात आहे. यातून त्यांच्या कुटुंबाला आर्थिक मदत होईल, असा या उपक्रमाचा उद्देश असल्याचे अरुणा शहा यांनी सांगितले.
महिलांच्या कलागुणांना वाव मिळावा, या उद्देशाने पिको-फॉल आणि एम्ब्रॉयडरी मशीन देण्यात आल्याचे मुख्य सचिव शिल्पा हजारे यांनी सांगितले.
अनोखी क्लबच्या अध्यक्षा डॉ. सावित्री दोड्डण्णावर यांनी महिलांना या साहित्याचा उपयोग होईल, असे सांगितले. याचबरोबर मठ गल्ली येथील जैन बस्ती व शहापूर येथील जैन भवन येथे वॉटर प्युरिफायर भेट देण्यात आला.
या कार्यक्रमाला कमला जैन, लता परमार, उज्ज्वला मेहता, गाया जैन, सुनीता संचेती, अलका पोरवाल, रिया पोरवाल, सुरेखा गौरगोंडा, रुपा पाटील, अनुराधा तिगडी, अनुपमा, स्वाती जोग यांसह इतर सदस्या उपस्थित होत्या.