नवी दिल्ली
ऑस्ट्रेलियाचा माजी फिरकी गोलंदाज शेन वॉर्नने भारताच्या सर्वकालीन संघाची निवड केली असून त्याने सौरव गांगुलीला कर्णधार म्हणून निवडले आहे. या संघात त्याने सचिन तेंडुलकर व नवज्योत सिंग सिद्धूचाही समावेश केला आहे. भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी व विद्यमान कर्णधार विराट कोहली यांची त्याने निवड केलेली नाही. ज्यांच्याविरुद्ध मुकाबला केला, केवळ त्या काळातील खेळाडूंचीच निवड केली असल्याने या दोघांना या संघात स्थान दिले नसल्याचे वॉर्नने स्पष्ट केले आहे. ‘मी ज्यांच्याविरुद्ध खेळलोय, त्यांचा विचार केला असल्यामुळे धोनी व कोहलीचे नाव त्यात तुम्हाला दिसणार नाही, असे त्याने सांगितले. एकेकाळी त्याचा ‘कडवा प्रतिस्पर्धी’ असलेल्या लक्ष्मणकडेही त्याने दुर्लक्ष केले आहे. गांगुलीला संघात स्थान देण्यासाठी लक्ष्मणला वगळावे लागले असल्याचे वॉर्न म्हणाला.
वॉर्नने निवडलेला सर्वकालीन सर्वोत्तम भारतीय संघ : गांगुली (कर्णधार), सेहवाग, नवज्योत सिद्धू, द्रविड, तेंडुलकर, अझहरूद्दिन, कपिलदेव, नयन मोंगिया (यष्टिरक्षक), हरभजन, जे. श्रीनाथ, अनिल कुंबळे.
‘गांगुलीला कर्णधार म्हणून निवडायचे होते, त्यामुळे लक्ष्मणला वगळावे लागले,’ असे तो म्हणाला. नयन मोंगियाला त्याने यष्टिरक्षक म्हणून निवडले असून विश्वचषक विजेता कर्णधार कपिलदेव, फिरकी गोलंदाज हरभजन सिंग व अनिल कुंबळे व वेगवान गोलंदाज जवागल श्रीनाथ यांचीही त्याने निवड केली आहे. वॉर्नने सेहवाग व सिद्धू यांना सलामीवीर म्हणून निवडले असून राहुल द्रविड, तेंडुलकर व अझहरूद्दिन असे भक्कम फलंदाज निवडले आहेत. सिद्धू फिरकी गोलंदाजी उत्तम खेळत असे, म्हणून त्याची निवड केल्याचे त्याने सांगितले.
शेन वॉर्नने निवडलेला सर्वकालीन सर्वोत्तम भारतीय संघ : गांगुली (कर्णधार), सेहवाग, नवज्योत सिद्धू, द्रविड, तेंडुलकर, अझहरूद्दिन, कपिलदेव, नयन मोंगिया (यष्टिरक्षक), हरभजन सिंग, जे. श्रीनाथ, अनिल कुंबळे.