मुंबई
रिझर्व्ह बँकेची द्वैमासिक पतधोरण बैठक पुढील महिन्यात होत असून त्यात रेपो दर जैसे राहण्याबाबतची शक्यता वर्तवली जात आहे. कोरोनामुळे पुन्हा अनिश्चितता घोंघावत असताना भारतीय रिझर्व्ह बँक पुढील महिन्यात होणाऱया पतधोरण समितीच्या बैठकीत रेपो रेट जैसे थे ठेऊ शकते, असे जाणकार सांगत आहेत. सध्याच्या घडीला व्याजदर वाढवणे शक्य नसल्याचेच एकंदर वातावरणावरून दिसून येत आहे. गव्हर्नर शक्तीकांत दास यांच्या अध्यक्षतेखाली 5 तारखेला बैठक सुरू होणार असून 7 एप्रिलला दराबाबतची घोषणा केली जाणार आहे. याआधी समितीची बैठक 5 फेबुवारीला आयोजीत करण्यात आली होती, ज्यात रेपो रेट जैसे ठेवण्यात आला होता. रिझर्व्ह बँक सध्याही नरमाईची भूमिका कायम ठेवणार असून रेपो दरात वाढीची शक्यता तज्ञांनी फेटाळून लावली आहे.