बेंगळूर/प्रतिनिधी
माजी मंत्री रमेश जारकिहोळी यांच्या लैंगिक गैरप्रकारात सामील असलेल्या महिलेला सुरक्षा पुरवण्यासाठी गृहमंत्री बसवराज बोम्माई यांनी विशेष तपास पथकाला (एसआयटी) शनिवारी रात्री उशिरा निर्देश दिले. महिलेने संरक्षण देण्यासंदर्भात व्हिडिओ प्रसिद्ध केल्यावर गृहमंत्र्यांनी हे निर्देष दिले आहेत.
गृहमंत्र्यांनी तिने मला एका व्हिडिओमध्ये संरक्षण देण्यासंदर्भात वक्तव्य केले होते. त्यांनतर मी एसआयटीला महिलेला आवश्यक सुरक्षा पुरवण्यास सांगितले आहे. तसेच “मी एसआयटीला या व्हिडिओमध्ये सत्य काय आहे हे बाहेर येण्यासाठी तपास सुरू ठेवण्याचे निर्देशही दिले आहेत.”
दरम्यान आमदार रमेश यांनी महिलेचा संरक्षण मिळवण्याचा व्हिडिओ त्याच्या विरोधातील षडयंत्राचा भाग होता. “मी तक्रार दाखल केल्यावर (त्या महिलेचा) व्हिडिओ समोर आला आहे. हे षड्यंत्र आहे, असे ते म्हणाले.