झूम, जिओमीटसह अन्य ऍपसोबत टक्कर देणार
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
मोबाईल ऑपरेटर भारती एअरटेलने अमेरिकेची दिग्गज दूरसंचार कंपनी वेरिजॉनसोबत हातमिळवणी केली असून त्यांच्या मदतीने व्हीडीओ कॉन्फरन्ससाठी एअरटेलने आता ब्लूजींस या ऍपचे सादरीकरण केले आहे. एअरटेलने हे ऍप येत्या काळात जिओमीटला टक्कर देणार असल्याचे म्हटले आहे.
जिओमीट एन्टरप्राईजेस आणि ग्राहक दोघांसाठी उपलब्ध आहे तर एअरटेलची सुविधाही सुरवातीच्या काळात फक्त एन्टरपाईजेस ग्राहकांसाठी उपलब्ध होणार आहे. जिओमीटसह एअरटेल ब्लूजींसला मार्केटमध्ये झूम, किस्को वेबेक्स आणि मायक्रोसॉफ्ट टीम्स यासारख्या लोकप्रिय व्हीडीओ कॉन्फरन्सची सेवा देणाऱया ऍप्ससोबत टक्कर देण्यासाठी तयार राहावे लागणार असल्याचे म्हटले जात आहे.
एअरटेलच्या ब्लूजींस या कॉन्फरन्स ऍपला येत्या काळात 50 हजारपेक्षा अधिक ग्राहक जोडले जाण्याचा अंदाज भारती एअरटेलचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोपाल विठ्ठल यांनी व्यक्त केला आहे.
मोफत सेवा
डाटा होस्टिंग भारतात होणार आहे. कंपनी सुरक्षा आणि ग्राहकांच्या वैयक्तिक माहितीच्या सुरक्षेसाठी कटिबद्ध राहणार आहे. यासोबतच आपल्या ग्राहकांना पहिले तीन महिने सेवा मोफत देणार आहे.