पॉवर बँकेने चार्ज करण्याची सुविधा : सवलतीच्या दरात उपलब्ध होणार
नवी दिल्ली
शाओमी कंपनी विविध नाविन्यपूर्ण उत्पादने सादर करण्यात अग्रेसर असणारी कंपनी आहे. तिने आतापर्यंत विविध घरगुती उत्पादनांसोबत अन्य आकर्षक उत्पादने बाजारात आणली आहेत. सध्या पोर्टेबल इलेक्ट्रिक एअर कॉम्प्रेसरचे सादरीकरण केले आहे. याचा वापर वाहनांमध्ये हवा भरण्यासाठी करण्यात येणार असल्याचे म्हटले आहे. पूर्ण चार्ज केल्यानंतर कार टायर किंवा आठ सायकल टायरमध्ये हवा भरण्याची क्षमता यामध्ये असल्याचा खुलासा कंपनीने केला आहे.
सदरच्या उपकरणाची क्राउडफंडिंग प्लॅटफॉर्मवर किमत सवलतीत 2,299 रुपये आहे. तसेच ही योजना संपल्यानंतर हा दर 3,499 रुपयावर राहणार असल्याचा अंदाज आहे.
रचना कॉम्प्रेसरची
सदरचा हवा भरण्याचा पंप हा वजनाने हलका आहे. याला नियमित वापरण्यात येणाऱया पॉवर बँकेच्या मदतीने चार्ज करण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे.
दावा शाओमीचा
सदरच्या हवा भरण्याच्या पंपाने 6 मिनिटात कार टायर आणि 3 मिनिटात सायकलच्या टायरमध्ये हवा भरता येण्याचा दावा शाओमीकडून केला आहे. तसेच टायर प्रेशर तपासण्याची सोयही उपलब्ध करुन दिल्याचे म्हटले आहे. ऑगस्ट 2020 पासून यांचा पुरवठा सुरु होणार असल्याचे स्पष्ट केले आहे.