विज्ञानाने कितीही प्रगती केली असली तरीही काही गोष्टी अद्याप आमच्यासाठी रहस्य आहेत. पृथ्वीवरील अशा अनेक ठिकाणांपैकी एक जागा व्हेनेझुएलात आहे. येथील एका सरोवरावर सातत्याने वीज चमकत राहते आणि असे कित्येक दशकांपासून घडत आहे. या रहस्याला बीकन ऑफ मॅराकाइबो म्हटले जाते. तसेच याला निसर्गाचे वीजघरही म्हणण्यात येते.
व्हेनेझुएलाच्या मॅराकाइबो सरोवरात हा चमत्कार घडतो. कॅटाटुम्बो नदी सरोवराला जेथे मिळते, तेथे सातत्याने वादळे येतात. येथे वर्षाला सरासरी 260 दिवस प्रचंड वादळे धडकत असतात. नदी आणि सरोवराच्या संगमक्षेत्रावर एका मिनिटात 28 वेळा विजेचा कडकडाट होतो. विशेषकरून रात्री येथे पूर्णवेळ विजेचा कडकडाट होत असतो. विजेचा हा कडकडाट 400 किलोमीटर अंतरावरूनही पाहिला जाऊ शकतो.
मॅराकाइबो सरोवराचे नाव गिनीज बुकमध्ये नोंद झाले आहे. वर्षभर सलग वादळे आणि विजेच्या कडकडाटाला तोंड देणारे हे जगातील एकमात्र ठिकाण आहे. कुठल्याही ठिकाणी दुसऱयांदा विजेचा कडकडाट होत नसतो. पण मॅराकाइबो सरोवराविषयी असे म्हटले जाऊ शकत नाही. याचे रहस्य जाणून घेण्याचा पहिला प्रयत्न 1960 मध्ये झाला. जमिनीखाली युरेनियमचे अधिक प्रमाण विजेचा आकर्षित करतल असेल असा वैज्ञानिकांचा विचार होता. पण त्यानंतर अनेक निष्कर्ष समोर आले.
या क्षेत्रात मिथेन मोठय़ा प्रमाणात असल्याने असे घडत असल्याचे एका संशोधनात आढळून आले. पण हा निष्कर्ष वैज्ञानिकांना ठोस वाटला नाही. रहस्यांनी घेरलेले असल्याने स्थानिक लोकांमध्ये सरोवराविषयी अनेक दंतकथा तयार झाल्या आहेत. तेथे एखाद्या प्राचीन आत्म्याचा वास असल्याचा किस्साही प्रचलित आहे.