प्रतिनिधी / बार्शी
भारतीय जनता पार्टीच्या अल्पसंख्याक मोर्चा च्या बार्शी तालुका अध्यक्ष पदी बार्शीतील सामाजिक कार्यकर्ते व अल्पसंख्याक यांच्यासाठी कार्य करणारे शकील मुलाणी यांची निवड करण्यात आली. लक्ष्मी सोपान प्रायव्हेट मार्केट कमिटी या ठिकाणी भाजप च्या पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या झालेल्या बैठकीत निवड पत्र भारतीय जनता पार्टीचे जिल्हा अध्यक्ष श्रीकांत देशमुख यांनी दिले यावेळी आमदार राजेंद्र राऊत,मा.श्रीकांत दादा देशमुख, भाजप बार्शी तालुका मदन दराडे सर, भाजप शहर अध्यक्ष महावीर कदम,नानासाहेब राऊत,संतोष दादा निंबाळकर,
पंचायत समिती सभापती अनिल डीसले , बाबासाहेब काटे,प्रमोदजी वाघमोडे, अविनाश मांजरे मा.उपसभापती, काका काटे, अडओकॅटे राजश्री डमरे,अजित बारंगुळे , सलीम मुलाणी पिंटू यादव, किरण कोकाटे आदी उपस्थित होते. यावेळी शकील मुलाणी यांनी सांगितले की बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली अल्पसंख्याक वर्गासाठी करणार असून पक्षाचे कार्य वाढवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.