16 नवे रुग्ण, महाराष्ट्रातून येणाऱयांवर नजर
प्रतिनिधी/ बेळगाव
शनिवारी बेळगाव शहर व जिह्यातील 232 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला असून 16 नव्या रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे जिह्यातील एकूण बाधितांची संख्या 26 हजार 849 वर पोहोचली आहे. दरम्यान महाराष्ट्र व केरळातून येणाऱयांवर कडक नजर ठेवण्यात येणार आहे.
हुदली, मुतगा, महांतेशनगर, टिळकवाडी, भाग्यनगर परिसरात शनिवारी पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. एका महांतेशनगर येथील तिघा जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. बेळगाव शहर व तालुक्मयातील सात जणांचा यामध्ये समावेश आहे.
अद्याप 72 सक्रिय रुग्णांवर उपचार करण्यात येत आहेत. आतापर्यंत 26 हजार 431 जणांनी कोरोनावर मात केली आहे. 1126 जणांचा अहवाल यायचा आहे. तर 24 हजार 682 जण 14 दिवसांच्या होमकेअरमध्ये आहेत. महाराष्ट्रातील काही जिह्यात वाढती रुग्ण संख्या लक्षात घेवून लॉकडाऊन जारी करण्यात आला आहे.
या पार्श्वभूमिवर महाराष्ट्रातून कर्नाटकात येणाऱयांवर बारकाईने नजर ठेवण्याची सूचना राज्य सरकारने केली आहे. जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी पुणे-बेंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील कोगनोळी जवळ पुन्हा तपास नाका सुरू करण्याची सुचना तहसीलदारांना केली आहे. महाराष्ट्र व केरळमधून कर्नाटकात येणाऱयांसाठी आरटीपीसीआर तपासणी अहवालाची सक्ती करण्यात आली आहे.