प्रतिनिधी/ सातारा
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी न करण्याचे आदेश असताना देखील जिल्हाधिकाऱयांच्या आदेशाचा भंग केल्याप्रकरणी येथील शनिवार पेठेतील विजय पावटे या बर्थडे बॉयसह या परिसरातील 12 युवकांवर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 1 रोजी सायंकाळी 7 च्या सुमारास येथील शनिवार पेठेत काही युवक सार्वजनिक ठिकाणी जमाव जमवून वाढदिवस साजरा करत असल्याची तक्रार शाहूपुरी पोलीस ठाण्यात आली. त्यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शितोळे व कर्मचारी तिथे तातडीने गेले असता पोलीस आल्याचे पाहून जमलेली मुले पळून गेली.
पोलिसांनी चौकशी केल्यानंतर तिथे विजय पावटे (रा. शनिवार पेठ) याचा वाढदिवस साजरा केला जात होता. त्यावेळी तिथे राज महेश घोडके, सिध्दांत किशोर जानी, साहील गणेश राजपाध्ये, स्वयंम रोहित गवळी, कुणाल गवळी, आदित्य गजानन घोडके, कारंजकर व गवळी यांच्यासह आणखी मुले होती. पोलिसांनी या सर्वांवर सार्वजनिक ठिकाणी गर्दी जमवण्यास बंदी असताना देखील अशा प्रकारे जमाव जमवून आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे. याबाबत कॉन्स्टेबल राहूल चव्हाण यांनी तक्रार दिली आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शितोळे करत आहेत..