माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांचे मत
प्रतिनिधी/ पणजी
गोव्याच्या पहिल्या मुख्यमंत्री शशिकलाताई काकोडकर यांचे राजकीय नेतृत्व कणखर होते. त्यांनी महिलांना सशक्त व स्वालंबी बनविले त्यामुळे त्यांची जयंती हा महिला सशक्तीकरण दिवस म्हणून साजरा करावा, असे उद्गार गोव्याचे माजी मुख्यमंत्री प्रा. लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी सांगितले. गोमंतक मराठा समाजातर्फे शशिकलाताई काकोडकर यांच्या जयंतीनिमित्त मराठा सभागृहात आयोजित केलेल्या कार्यक्रमाला ते प्रमुख अथिती म्हणून बोलत होते.
गोव्याचे पहिले मुख्यमंत्री भाऊसाहेब बांदोडकर व पहिल्या महिला मुख्यमंत्री शशिकलाताई काकोडकर यांनी शिक्षणाला प्राधान्य दिले. भाऊसाहेब यांचे दृष्ठनेतृत्व असलेले नेते होते. या दोघांनी आज खरा गोवा घडविला आहे. त्यांनी गोव्यात अनेक सूधारण केल्या विकासाला चालना दिली. महिलांना बळकट व सशक्त करण्यात त्यांचा वाटा मोलाचा आहे. आज महिला सशक्तकरणाची खरी गरज आहे. महिला या फक्त घर सांभळण्यासाठी नाही तर त्याची समाजासाठी जबाबदारी आहे. आज अनेक महिला उच्चपदावर काम करत आहे. पण प्रत्येक घरामध्ये महिलांना चांगली वागणूक दिली जाते असे नाही. त्यामुळे महिलांना अगोदर सशक्त करणे गरजेचे आहे, असेही यावेळी प्रा. पार्सेकर यांनी सांगितले.
ताईनी मला राजकरणात आणलेः दयानद नार्वेकर
माजी मुख्यमंत्री शशिकला काकोडकर यांचे शासन हे गोव्याल नवी दिशा देणारे होते. ताईचे व माझे राजकीय मतभेद असले तरी आमचे कौटुबिक संबध चांगले होते. त्या माझ्या राजकीय मार्गदर्शक होत्या. 1977 साली हळदोणा मतदारसंघात मगो पक्षातर्फे त्यांनी मल स्वातःबोलावून उमेदवारी दिली होती. त्यांच्यामुळे मी आमदार मंत्री झालो. शशिकला काकोडकरांच्या शासनकाळात सर्व सरकारी अधिकारी त्यांना घाबरत होते. योग्य रित्या त्या सर्व काम हाताळत होत्या. समाजातील सर्व लोकांना समान अधिकार दिले जायचे. त्यांनी मराठी भषेसाठीसाठी पर्वरी येथे मराठी भवन उभरण्यासाठी प्रयत्न केले. पुढे राणे सरकारने त्यांचा आदर्श घेऊन त्यांचे काम पुढे नेण्याचे काम केले, असे sमाजी उपमुख्यमंत्री दयानंद नार्वेकर यांनी सांगितले.
माजीमुख्यमंत्री शशिकलाताई यांना कोणत्याही प्रसंगाना तोंड देण्याची क्षमता होती. त्यांच्या कार्याची पावती आताच्या पिढीला कळणे गरजेचे आहे. सर्वांनी एकत्र घेऊन काम करण्याची त्यांची जीद्द तसेच सर्वाना योग्य मार्गदर्शन करणे हे त्यांचे अष्टपैलू असे व्यक्तीमत्व होते. शिक्षण समाज कल्याण सारखी मंत्रीपद सांभाळून ताईने शिक्षण क्षेत्रात महिलांची उन्नती केली. समाजाचाही विकास घडवून आणला. ताईचे प्रशासन चांगले होते. सरकारी अधिकाऱयांना त्याची धाक होती. कसलाच भ्रष्टाचार केला जात नव्हता, असे माजी आमदार धर्मा चोडणकर यांनी सांगितले.
या कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून समाजसेवक डॉ. रामकृष्ण मोरजकर लाभले होते. तर खास निमंत्रित म्हणून यतिन काकोडकर होते. यावेळी ‘महिला सशक्तीकरण’ व ‘शशिकलाताई काकोडकर जीवन व कार्य’ या विषयावर अखिल गोवा महिला पंच मर्यादित वत्कृत्व स्पर्धा घेण्यात आली. यात राज्यभरातील अनेक महिला पंच सदस्यांनी भाग घेतला. या वकृत्व स्पर्धेचे परिक्षक म्हणून पत्रकार राजू नाईक व प्रा. अरविंद वाडीकर उपस्थित होते. यात प्रथम पारितोषिक मेरशे पंचायतीच्या सदस्या प्रणिता कळंगुटकर यांना प्राप्त झाले तर द्वितीय पिळगाव पंचायतीच्या ललना गिमोणकर यांना प्राप्त झाले तर उत्तेजनार्थ वळगे पंचातच्या उन्नती सहस्त्रबुद्धे व सेंट लॉरेन्स पंचायतीच्या सुकोरिना गोन्साल्विस यांना प्राप्त झाले.
तद्नंतर शशिकलाताई काकोडकर ‘जीवन व काय’& या विषयावर परिसंवाद घेण्यात आला यात अध्यक्ष म्हणून माजी आमदार धर्मा चोडणकर उपस्थित हाते. माजी मंत्री निर्मला सावंत, महिला बाल विकास खात्याच्या संचालिका दिपाली नाईक व ज्येष्ठ पत्रकार नीना नाईक यांचा सहभाग होता. या मान्यवरांनी यावेळी शशिकलाताई काकोडकर यांचे विचार याठिकाणी व्यक्त केले. त्यांनतर समोरोपाच्या वेळी गोव्यातील नामवंत अशा ज्येष्ट समाजसेविका कमलिनी रमाकांत पैगीणकर व समाजसेविका डॉ. आशा विश्वनाथ सावर्डेकर यांचा प्रमुख पाहूण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला गोमंतक मराठा समाजाचे अध्यक्ष गोरख मांद्रेकर तसेच इतर सभासद, शिक्षक विद्यार्थी पंच सदस्य मोठय़ा संख्येने उपस्थित होते.