बेंगळूर : तामिळनाडूतील एआयएडीएमकेच्या नेत्या शशिकला नटराजन यांची आठवडाभरात कारागृहातून मुक्तता होणार आहे. तत्पुर्वीच त्यांची प्रकृती खालावली असून त्यांना बुधवारी अधिक उपचारासाठी बेंगळूरच्या बौरिंग इस्पितळात दाखल करण्यात आले आहे. बेहिशेबी मालमत्ता संपादनप्रकरणी शशिकला नटराजन यांना चार वर्षांचा तुरुंगवास आणि 10 कोटी रुपये दंडाची शिक्षाा ठोठावण्यात आली होती. त्यांचा चार वर्षांचा तुरुंगवास पूर्ण झाला असून त्यांच्या कुटुंबीयांनी न्यायालयात 10 कोटी रुपये दंडाची रक्कम जमा केली आहे. त्यामुळे शशिकला यांची 27 जानेवारी रोजी सकाळी बेंगळूरच्या परप्पन अग्रहार कारागृहातून मुक्तता केली जाणार आहे. दरम्यान, बुधवारी त्यांची प्रकृती अचानक खालावल्याने त्यांना कारागृहातील इस्पितळात दाखल करण्यात आले. त्यानंतर अधिक उपचारासाठी बौरिंग इस्पितळात दाखल करण्यात आले आहे. मागील दोन-तीन दिवसांपासून शशिकला यांच्या छातीत वेदना, श्वसनावेळी त्रास जाणवत असल्याने डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांना इस्पितळात दाखल करण्यात आले आहे, अशी माहिती कारागृहाच्या अधिकाऱयांनी दिली आहे.
Previous Articleप्रदेश काँग्रेसमध्ये आणखी दोन कार्याध्यक्षांची वर्णी
Next Article गोहत्या बंदी कायदा काटेकोरपणे जारी करा
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.