प्रतिनिधी/ बेळगाव
शहरात गॅसलाईनद्वारे घरगुती गॅसचा पुरवठा करण्यात येत आहे. त्या पाठोपाठ आता व्यावसायिक कारणासाठी देखील गॅसचा पुरवठा पाईपलाईनद्वारे करण्यात येत आहे. शहरात सीएनजी गॅस पुरवठा करणाऱया दुसऱया पेट्रोलपंपचे उद्घाटन नुकतेच करण्यात आले.
गॅसलाईनद्वारे घरोघरी गॅस पुरवठा केला जात आहे. वाहनांना देखील सीएनजी गॅस पुरवठा करण्यात येत आहे. गांधीनगर येथे पहिला उपक्रम राबविण्यात आला होता. उद्यमबाग परिसरात दुसऱया सीएनजी पेट्रोलपंपचे उद्घाटन करण्यात आले. प्रदूषणाचे प्रमाण कमी करण्यासाठी सीएनजीवर चालणाऱया वाहनांना प्राधान्य देण्यात येत आहे. त्यामुळे गॅसलाईनद्वारे सीएनजी गॅस पुरवठा करणाऱया पेट्रोलपंपांची संख्या वाढविण्यात आली आहे. सध्या सीएनजीवर चालणाऱया प्रवाशी रिक्षांची संख्या वाढत आहे. पण गॅस पुरवठा करणाऱया पेट्रोलपंपांची संख्या कमी असल्याने वाहनधारकांना अडचणीचा सामना करावा लागत आहे.
सीएनजीवर चालणाऱया वाहन चालकांची गैरसोय पाहून उद्यमबाग परिसरात सीएनजी पेट्रोलपंप सुरू करण्यात आला आहे. मेगा गॅस इंजिनिअरिंग आणि इंडियन ऑईल कार्पोरेशनच्या संयुक्त विद्यमाने सीएनजी स्टेशनची सुरुवात करण्यात आली आहे. त्यामुळे वाहनधारकांच्या सोयीचे झाले आहे.