विजांच्या कडकडाटासह पाऊस : जाणवणारा उष्मा काही प्रमाणात कमी झाल्याने दिलासा
प्रतिनिधी / बेळगाव
विजांच्या कडकडाटासह रविवारी बेळगाव शहर व उपनगरांमध्ये तुरळक पाऊस झाला. सकाळपासून हवेत वाढलेला उष्मा व दुपारनंतर पावसामुळे पसरलेला थंडावा असे वातावरण रविवारी अनुभवायला मिळाले. अचानक पाऊस दाखल झाल्याने व्यापारी तसेच शेतकऱयांची मात्र पुरती तारांबळ उडाली.
मागील दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण तयार झाले होते. पाऊस होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत होता. रविवारी सकाळपासून हवेतील उष्म्यात वाढ झाली होती. त्यानंतर तयार झालेल्या ढगाळ वातावरणामुळे पाऊस दाखल होण्याची चिन्हे होती. दुपारनंतर शहर तसेच उपनगरांमध्ये पावसाच्या तुरळक सरी दाखल झाल्या. पाऊस पडल्याने मागील काही दिवसांपासून जाणवणारा उष्मा काही प्रमाणात कमी झाला.
शेतकरी-व्यापाऱयांना फटका
दुपारनंतर दाखल झालेल्या पावसाने रस्त्याशेजारी साहित्याची विक्री करणाऱया विपेत्यांना त्याचा फटका बसला. विक्रीसाठी ठेवलेले साहित्य भिजून खराब होऊ नये यासाठी तारेवरची कसरत करत होते. सध्या शेतामध्ये फ्लॉवर, कोबी, मिरची, टोमॅटो, उन्हाळी बटाटे यांचे पीक घेतले जात आहे. या पिकांना पावसामुळे फटका बसला आहे. पिके खराब होण्याची भीती शेतकऱयांना आहे. त्यामुळे या पावसाचा मोठा फटका शेतकऱयांना सहन करावा लागणार आहे.
बाजारपेठेत शुकशुकाट
रविवारी साप्ताहिक सुटी असल्याने नोकरदार खरेदीसाठी बाहेर निघतात. रविवारी सकाळी मारुती गल्ली, गणपत गल्ली, किर्लोस्कर रोड, समादेवी गल्ली, खडेबाजार, काकतीवेस रोड आदी परिसरात खरेदीसाठी गर्दी होती. मात्र, दुपारनंतर ढगाळ वातावरणाने हळुहळु गर्दी कमी झाली. पाऊस झाल्यानंतर मात्र शुकशुकाट होता. पावसाचा जोर कमी होताच सायंकाळी 5 नंतर पुन्हा एकदा खरेदीसाठीचा जोर पाहायला मिळाला.