प्रतिनिधी / बेळगाव
वारंवार सूचना करूनही शहरात विनामास्क फिरणाऱया नागरिकांवर महानगरपालिकेतर्फे कारवाई करण्यात येत आहे. मनपा आयुक्तांनी दिलेल्या सूचनेनुसार शहराच्या विविध भागांमध्ये शुक्रवारी दिवसभर कारवाई करण्यात आली. मास्क न वापरणाऱयांकडून 100 रुपयांची दंड वसुली केली जात आहे.
खडेबाजार, हुतात्मा चौक, धर्मवीर संभाजी चौक, मारूती गल्ली या वर्दळीच्या ठिकाणी मास्क न घालता अनेकजण फिरताना दिसत आहेत. या ठिकाणी मनपाकडून शुक्रवारी कारवाई करण्यात आली. विनामास्क घालताना फिरणारे नागरिक, फेरीवाले, विपेते, दुचाकी व चारचाकी चालक यांच्यावर कारवाई करण्यात आली.