सातारा / प्रतिनिधी :
सातारा शहरातील करंजे, गोडोली, सदरबजार, मंगळवार पेठ या भागात डेंग्यूचे प्रमाण वाढले आहे. या भागात डेंग्यूची साथ असून, अनेकजण खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. आरोग्य विभागाकडून साथीच्या आजाराने आजारी असल्याचा अहवाल जिल्हा हिवताप कार्यालयाकडे आला असून, शनिवारी या परिसरात पालिका आणि हिवताप कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने सर्व्हे करण्यात येणार आहे. सातारा पालिकेच्या आरोग्य विभागाच्या पाच धुर फवारणी मशिन सध्या बंद आहेत. त्यामुळे पाच मशिनच्या सहाय्याने धुर फवारणी सुरु आहे.
शहरात काही ठिकाणी पावसाचे पाणी साठून राहिले होते. त्या ठिकाणी डासांची उत्पत्ती झाल्याने डेंग्यूच्या साथीचा विळखा सातारा शहराला पडू लागला आहे. शहरातील करंजे, गोडोली, सदरबाजार आणि मंगळवार पेठेत ही साथ मोठ्या प्रमाणावर पसरली आहे.