7 ऑक्टोबरपासून शारदीय नवरात्रोत्सवाला प्रारंभ : दांडियासाठी टिपऱया,पोषाख बाजारपेठेत दाखल
प्रतिनिधी /बेळगाव
गणेशोत्सवानंतर शहराला नवरात्रोत्सवाचे वेध लागले आहेत. पक्षपंधरवडा संपल्यानंतर 7 ऑक्टोबरपासून शारदीय नवरात्रोत्सवाला प्रारंभ होणार आहे. सध्या कोरोना नियंत्रणात असल्याने कोविड-19 च्या नियमांचे पालन करून नवरात्र साजरी करता येणार आहे. अर्थातच शहरवासियांना गरबा, दांडियाचा तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचा आनंद घेता येणार आहे.
या उत्सवात लोकांना सहभागी होता येणार असल्याने त्याचा विशेष आनंद व्यापारी व विपेत्यांना झाला आहे. गरबा, दांडियांच्या दृष्टीने त्यांनी तयारी सुरू केली आहे. बुरुड गल्लीमध्ये टिपऱया तयार करण्यास वेग आला आहे. पूर्वीच्या पारंपरिक टिपऱयांवर आता आधुनिक साज चढला आहे. त्यामुळे फक्त चॉकलेटी रंगाच्या टिपऱया आता मिळत नाहीत. तर त्यावर विविध रंगकाम करून नक्षी रेखाटून टिपऱयांवर नवीन साज चढविण्यात आला आहे.
सध्या वस्त्रप्रावरणाच्या दुकानामध्ये दांडियाचे पोषाख विक्रीस आले आहेत. चनिया चोली, घागरा घातलेल्या मेनिक्वीन्स दुकानांच्या दारांमध्ये दिसत आहेत. त्यामुळे आता या पोषाखांची खरेदी अधिक प्रमाणात होण्याची शक्मयता दिसत असून विपेत्यांनी त्यासाठी तयारी सुरू केली.
अतिउत्साही व हौशी मंडळी प्रामुख्याने तरुणाईने हे पोषाख खरेदी करण्यासाठी दुकाने पालथी घालण्यास सुरुवात केली आहे. अर्थातच पक्षमास संपल्यानंतर खरेदी होणार असल्याचा अंदाज दुकानदारांनी व्यक्त केला. फक्त नवरात्रीपुरता हा पोषाख घेण्याऐवजी भाडेतत्वावर पोषाख घेण्यासाठीसुद्धा तयारी सुरू झाली आहे. शहरात ठिकठिकाणी गरबा, दांडियासाठी पोषाख देणाऱया मंडळीनीसुद्धा पोषाख तयार करून ठेवले आहेत.
अलीकडे गरबा, दांडियाच्या पोषाखाबरोबरच ऑक्सिडाईड दागिने वापरण्याकडे कल आहे. त्यामुळे तसे दागिनेही विक्रीस आले आहे. बिंदी, बांगडय़ा, कंबरपट्टा, लहान आकारापासून ते मोठय़ा ठसठशीत दिसतील असे गळय़ातले हार, पैंजण, अंगठय़ा, आदी दागिन्यांची खरेदी बऱयापैकी होईल, अशी आशा विपेत्यांना आहे.
दरम्यान मंदिरेसुद्धा दर्शनासाठी खुली करण्यात आल्याने मंदिरांमध्येही नवरात्राची तयारी सुरू झाली असून मंदिरे आणि परिसर स्वच्छ करून रंगरंगोटी करण्यावर भर देण्यात येत आहे. या दरम्यान विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजनही करण्यात आले आहे. एकूणच यंदाच्या शारदीय नवरात्रोत्सवासाठी शहरवासीय आतूर झाले आहेत.