प्रतिनिधी / इचलकरंजी
शहापूर, गणेशनगरातील गल्ली नंबर पाचमधील एका घरात सुरु असलेल्या तीन पानी जुगार क्लब पोलिसांनी छापा टाकला. क्लब मालकासह सात जणांना रंगेहाथ पकडून अटक केली. त्यांच्याकडून ४ हजार ३९० रुपयांची रोकड, जुगाराचे साहित्य जप्त केले. ही कारवाई शहापूर पोलिसांनी शुक्रवारी रात्री केली.
अटक केलेल्यांच्यामध्ये जुगार क्लब मालक रमेश नामदेव आडेकर (वय ५२, रा. गल्ली नं. ५, गणेशनगर, शहापूर), सदानंद रामा जाधव (वय५२, गल्ली नं. ४, गणेशनगर, शहापूर) मुकुंद नरसाप्पा सनदी (वय ६०, रा जनहीत पत संस्थेनजीक, गणेशनगर, शहापूर), संतोष धोंडीराम कळगुंडे (वय २५, रा. चांगदेव पाटील चौक, गणेशनगर, शहापूर), प्रकाश विठ्ठल चिनभुरे (वय ५३. रा. गल्ली नं. १. गणेशनगर, शहापूर) प्रफुल्ल प्रकाश पाटील (वय ३८, रा. लोकमान्यनगर, कोरोची), रविंद मनोहर गधंडे (वय ४२, रा. गल्ली नं. ५, गणेशनगर शहापूर) याचा समावेश आहे.
पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी कि, शहापूर येथील गणेशनगरातील गल्ली नंबर पाचमध्ये राहणारा रमेश आडेकर याने घरामध्येच तीन पानी जुगार क्लब सुरु केला होता. तसेच हा क्लब गेल्या काही दिवसापासून रासरोसपणे सुरु होता. याची माहिती शहापूर पोलीस ठाण्याचे गुन्हे शोध पथकाला मिळाली. या पथकाने शुक्रवारी रात्री या क्लबवर छपा टाकला. यावेळी क्लबच्या मालकासह सात जण तीन पानी जुगार खेळत असल्याचे आढळून आल्याने त्या सर्वांना अटक केली.