ओळख पटविण्यासाठी प्रयत्न सुरू.
प्रतिनिधी / बेळगाव
सराफ गल्ली, शहापूर येथे शनिवारी एका अनोळखी युवकाचा मृतदेह आढळून आला आहे. शहापूर पोलिसांनी सुमारे 35 ते 40 वषीय अनगोळी युवकाचा मृतदेह ताब्यात घेतले असून त्याची ओळख पटविण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे.
यासंबंधी अर्जुन शिराळकर यांनी शहापूर पोलीस स्थानकात फिर्याद दिली आहे. खडेबाजार रोडवरील शिराळकर वॉईन शॉप शेजारी झोपेत असतानाच या युवकाचा मृत्यू झाला आहे. शनिवारी दुपारी हा प्रकार उघडकीस आला आहे. कोणत्या तरी आजाराने त्याचा मृत्यू झाला असावा, असा संशय आहे.
यासंबंधी शहापूर पोलीस स्थानकात सीआरपीसी कलम 174 अन्वये अनैसर्गिक मृत्यू प्रकरण नोंदविण्यात आले आहे. मृतदेहाची ओळख पटविण्यासाठी प्रयत्न करण्यात येत असून संबंधितांनी शहापूर पोलीस स्थानकाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या युवकाजवळ एक बॅगही होती.