दक्षिणेतील लोकप्रिय अभिनेत्री आणि द फॅमिली मॅन या वेबसीरिजमधील स्वतःच्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकणाऱया समंथा अक्किनेनीने नव्या चित्रपटाच्या चित्रिकरणास प्रारंभ केला आहे. संमथाने आगामी चित्रपट ‘शांकुतलम’च्या चित्रिकरणास प्रारंभ केला आहे. निर्मात्यांनी यासंबंधीची चित्रिफत सोशल मीडियावर प्रसारित केली आहे. ही चित्रफित सोशल मीडियावर मोठय़ा प्रमाणावर व्हायरल होत आहे.
गुणासेखर टीमवर्कस या ट्विटर खात्यावरून ही चित्रफित प्रसारित करण्यात आली आहे. या चित्रफितीत घोडदौड सुरू असल्याचे दिसून येते. तर चित्रिकरणाचे दुसरे सत्र सुरू झाल्याचे यात म्हटले गेले आहे. ही चित्रफित प्रसारित करत ‘शांकुतलम’च्या चित्रिकरणाचे दुसरे सत्र सुरू’ अशा आशयाची कॅप्शन देण्यात आली आहे.
शांकुतलम चित्रपटाचे चित्रिकरण हैदराबाद शहरात सुरू झाले आहे. या चित्रपटात ऋषी विश्वामित्त आणि अप्सरा मेनका यांची कन्या शंकतुला तसेच राजा दुष्यंत यांची कथा दर्शविण्यात येणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन गुणशेखर करत आहेत. या चित्रपटात समंथा आणि मल्याळम अभिनेता देव मोहन मुख्य भूमिका साकारत आहे. गुना टीमवर्क्स बॅनर अंतर्गत नीलिमा गुणा या चित्रपटाची निर्मिती करत आहेत.