मुंबई
शाओमी कंपनीचा नवा एमआय टीव्ही 4 ए हॉरीझन एडिशनचा टीव्ही भारतात नुकताच लाँच करण्यात आला आहे. सदरचा टीव्ही 40 इंच आकाराचा असून 23 हजार 999 रुपये इतकी किंमत टीव्हीची असणार आहे.
2019 मध्ये लाँच करण्यात आलेल्या एमआय टीव्ही 4 ए 40 या टीव्हीची सुधारीत आवृत्ती यंदा सादर करण्यात आली आहे. सदरचा टीव्ही फ्लिपकार्ट, एमआयडॉटकॉम, एमआय स्टुडियो आणि एमआय रिटेल पार्टनर रिटेल स्टोअरवर विक्रीसाठी उपलब्ध असणार आहे.