टिळकवाडी परिसरात जनजागृती : संदेशपर फलक घेऊन विद्यार्थी सहभागी
प्रतिनिधी /बेळगाव
एसकेई सोसायटी संचलित व्ही. एम. शानभाग व एम. आर. भंडारी शाळेच्या संयुक्त विद्यमाने जागतिक सायकल दिनाचे औचित्य साधून भव्य सायकल फेरीचे आयोजन करण्यात आले होते. शुक्रवारी टिळकवाडी परिसरात नागरिकांमध्ये जागृती करत सायकल फेरी काढण्यात आली. ‘सायकल चालवा प्रदूषण थांबवा’, ‘सायकल चालवा इंधन वाचवा’ असे संदेश देणारे फलक घेऊन विद्यार्थी सायकल फेरीत सहभागी झाले होते.
यानिमित्त 5 वी ते 10 वी विद्यार्थ्यांची सायकल सजावट व सायकल संदेश फलक स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत मराठी विभागात लहान गट- प्रथम क्रमांक श्रद्धा यळ्ळूरकर, द्वितीय- पृथ्वीराज मुरकुटे, तृतीय- दिशा कृष्णाचे, मोठा गट- प्रथम क्रमांक- अथर्व जाधव, द्वितीय- वृषाली बांडगी, तृतीय- सोहम आंबेवाडीकर, कन्नड विभाग प्रथम- श्रावणी हुग्गी, द्वितीय- हर्षद पटदर, तृतीय- तानाजी मठपती, मोठा गट- प्रथम- चिन्मय जोशी, द्वितीय- आकाश खाडी, तृतीय- संदेश देवनागरी यांनी क्रमांक पटकाविले. परीक्षक म्हणून प्रगती संत्तीकर, पुष्पा बाबर, जे. डी. झेरे, एस. पी. आंबेवाडीकर, ए. बी. सव्वाशेरी यांनी काम पाहिले. ही सायकल फेरी यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी दोन्ही विभागाचे मुख्याध्यापक, शिक्षक वर्गाचे मार्गदर्शन लाभले.