- शाळेची स्थापना 1939
- शाळेत कार्यरत शिक्षक 2
- सन 2008-2009 साली शाळेचे स्थलांतर
- शाळेच्या वर्गखोल्या 2
- सर्व सोयीसुविधा उपलब्ध
शास्त्रीनगर येथील सरकारी मराठी शाळा क्र. 14 ही शाळा याचेच उदाहरण असून म. फुले रोड, शास्त्रीनगर, शहापूर या भागातील विद्यार्थ्यांना या शाळांनी साक्षर बनविले आहे. या शाळेची स्थापना 1939 साली करण्यात आली. भाडेतत्त्वावर सुरु झालेल्या या शाळेला स्वतःची हक्काची इमारत मिळाली. म. फुले रोड येथे मुख्य रस्त्यावर मोक्मयाच्या ठिकाणी ही शाळा होती. मात्र पुढे सन 2008-2009 या दरम्यान रस्त्याच्या रुंदीकरणात शाळेची इमारत पाडण्यात आली. परिणामी शाळेचे स्थलांतर शास्त्रीनगर येथे करण्यात आले.
2009 या शैक्षणिक वर्षापासून सरकारी कन्नड शाळेच्या आवारातील इमारतीत सरकारी मराठी शाळा क्र. 14 भरत आहे. इमारती, बंगल्याच्या शेजारुन वाहणाऱया नाल्याच्या कोपऱयावर सदर शाळा वसली आहे. सध्या शाळेत दोन शिक्षक आहेत. यामध्ये के. एन. मिरजकर हे प्रभारी मुख्याध्यापक म्हणून कार्यरत आहेत. तर पुष्पा मोगरे या सहाय्यक शिक्षिका म्हणून सेवा बजावत आहेत. इ. 1 ली ते 7 वीचे वर्ग आहेत. मात्र विद्यार्थी संख्या घटल्याने शिक्षक संख्या कमी करण्यात आली आहे.
इंग्रजीकडे वाढता कल
शास्त्राrनगर हा भाग अलीकडच्या काळात विकसित झाला आहे. यामुळे अनेक जाती, धर्माचे, भाषांचे लोक याठिकाणी राहतात. बंगला, इमारती असे साधारण स्वरुप शास्त्राrनगरमध्ये पहायला मिळते. यामुळे शाळेचे स्थलांतर शास्त्राrनगर भागात झाल्यानंतर विद्यार्थ्यांची संख्या घटत गेली. शिवाय इंग्रजीकडे वाढता कल असल्याने मातृभाषेतून शिक्षण घेण्याकडे पाठ फिरविल्याचे चित्र पहायला मिळत आहे. पूर्वी एका वर्गात तीस ते चार पटसंख्या असलेल्या शाळेची पटसंख्या आता घटली आहे.
सक्तीच्या बदलीतून शिक्षकांची बदली
शाळा मुख्य रस्त्यापासून आत आहे. मात्र शिक्षकांच्या प्रयत्नातून शाळेचे अस्तित्त्व टिकून आहे. विद्यार्थी मिळविण्यासाठी शिक्षकांनी भरपूर प्रयत्न केले आहेत. भी. एफ. जाधव, ए. एस. पाटील तसेच ए. आर. कोषावर हे शिक्षक या शाळेत कार्यरत होते. मात्र सक्तीच्या बदली प्रक्रियेतून शिक्षकांची बदली करण्यात आली. सध्या कन्नड शिक्षकांवर शाळेच्या प्रभारी मुख्याध्यापक पदाचा भार आहे. तर मराठी शिक्षक म्हणून अतिथी शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे.
माजी विद्यार्थ्यांचे सहकार्य
शाळेच्या माजी विद्यार्थ्यांचे शाळेला मोठे सहकार्य लाभले. पूरस्थितीत नाल्याचे पाणी वर्गखोल्यांमधून कमरेपर्यंत पोहोचले होते. पूरस्थिती ओसरल्यानंतर माजी विद्यार्थी तसेच तरुणाईच्या सहकाऱयातून शाळेची स्वच्छता करण्यात आली. शिवाय शाळेच्या वार्षिक उत्सवात तसेच राष्ट्रीय सणांमध्ये माजी विद्यार्थ्यांचे मोठे सहकार्य लाभते. शाळा सुधारणा कमिटीची देखील मदत होत असते. अध्यक्ष म्हणून रोहिणी घिवारी तर उपाध्यक्ष म्हणून मनिषा माने कार्यरत आहेत. पुढील शैक्षणिक वर्षात पटसंख्या वाढविण्यासाठी शिक्षकांकडून प्रयत्न करण्यात येत आहेत.
सोयीसुविधा उपलब्ध
शाळेची इमारत दुमजली आहे. शाळेला एक कार्यालय व दोन वर्गखोल्या आहेत. छोटे मैदान आहे. याशिवाय पिण्याचे पाणी, विद्युत व्यवस्था, शौचालय या सुविधा देखील उपलब्ध आहेत. अनेकांच्या मदतीतून शैक्षणिक साहित्य तसेच इतर सोयी उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न केला जातो.
राधिका सांबरेकर