प्रतिनिधी / पणजी
भारतीय शास्त्राrय संगीताचे अभ्यासक आणि नाटय़संगीताचे उपासक गोमंकातील ज्येष्ठ संगीत शिक्षक बाळकृष्ण केळकर यांचे मंगळवारी म्हापसा येथील एका खासगी इस्पितळात निधन जाले. 70 वर्षाचे होते.
गोव्यातील शास्त्राrय संगीताचे उपासक आणि ज्यांनी शेकडो विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे दिले आाण संपूर्ण आयुष्य संगीत क्षेत्रासाठी घातले ते गोमंतकातील शिक्षक गायक व संगीत नाटय़ कलाकार बाळकृष्ण केळकर यांच्या निधनाने त्यांच्या शेकडो विद्यार्थ्यांनी तसेच असंख्य चाहत्यांनी तीव्र दुःख व्यक्त केले.
बाळकृष्ण केळकर हे मूळ धारगळ येथील असून त्यांनी पं. बबनराव हळदणकर, गुरुवर्य करंदीकर, पं. प्रसाद सावकार, तसेच पं. रत्नाकर रामनाथकर यांच्याकडे संगीताचे शिक्षण घेतले. तसेच पं. सोमनाथबुवा च्यारी यांच्याकडून पारंपरिक, भजन, तसेच नाटय़संगीताचे देखील शिक्षण घेतले. आयुष्यभर त्यांनी संगीत क्षेत्राशिवाय दुसरा कोणताच विचार केला नाही. खोर्ली येथे आपल्या राहत्या घरी त्यांनी गांधर्व संगीत महाविद्यालयाचे परीक्षा केंद्र देखील सुरु केले होते. अभिजात संगीत विद्यालय स्थापन करून त्यांनी गोव्यात आपल्या मार्गदर्शनाखाली असंख्य विद्यार्थी तयार केले. संगीत क्षेत्रातील प्रतिष्ठेच्या गांधर्व संगीत महाविद्यालयाच्या परीक्षांना त्यांची परीक्षक म्हणून देशात अन्य ठिकाणी देखील निवड केली जात असे. आपली संगीत साधना सतत चालू ठेवली होती. त्यांच्या या क्षेत्रातील सेवेचा अनुभव लक्षात घेऊन गोवा सरकारने त्यांना 2015 मध्ये संगीत क्षेत्रासाठी गोवा राज्य पुरस्कार देऊन सन्मानीत केले होते.
अलिकडे केळकर यांना कोविडची बाधा झाल्याने त्यांना एका म्हापसा येथील खासगी इस्पितळात दाखल केले होते. मंगळवारी सकाळी 10 वा. त्यांचे निधन झाले. पंधरा दिवसापूंर्वा त्यांनी कोविडसाठीचा दुसरा डोस देखील घेतला होता. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, कन्या, जावई व नातवंडे तसेच गोपाळ, भास्कर व लक्ष्मण केळकर असे तीन भाऊ आणि दोन बहिणी असा परिवार आहे. त्यांच्या चिरंजीवाला देखील कोविडची बाधा झाल्याने त्याला इस्पितळात दाखल करण्यात आले होते. मात्र वडिलांचे अत्यसंस्कार करण्यासाठी आपल्या आजारपणात देखील त्यांनी येऊन हे संस्कार पूर्ण केले. कर्मळी येथील स्मशानभूमीत दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या निधनाने त्यांच्या शेकडो चाहत्यांनी व गोव्यातील संगीत क्षेत्रातील कलाकार आणि जाणकारांनी आपल्या तीव्र भावना व्यक्त करून त्यांना आदरांजली वाहिली.