प्रतिनिधी/ बेळगाव
शाहूनगर येथील एका तरुणावर चाकूहल्ला करण्यात आला आहे. शनिवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली असून यासंबंधी एपीएमसी पोलीस स्थानकात एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
अभिषेक कांबळे (वय 25, रा. शाहूनगर) असे जखमी तरुणाचे नाव असून याच परिसरात राहणाऱया सतीश नामक तरुणाने त्याच्यावर चाकूहल्ला केल्याची माहिती पोलिसांनी दिली. सहा महिन्यांपूर्वी झालेल्या भांडणातून ही घटना घडली आहे. चाकूहल्ल्यानंतर काही काळ तणाव निर्माण झाला होता. पोलीस अधिकाऱयांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. त्यानंतर गर्दीला पांगविण्यात आले. हल्ला करणाऱया सतीशवर भादंवि 307 कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून तो फरारी आहे. एपीएमसी पोलीस पुढील तपास करीत आहेत.