प्रतिनिधी/ सातारा
शाहूपुरी गावाला होणा-या अपु-या पाणीपुरवठयाची समस्या कायमची मिटवण्यासाठी कण्हेर धरणातून स्वतंत्र उदभव असलेली नवीन पाणीपुरवठा योजना शासना मार्पठत 2014 मध्ये मंजूर करण्यात आली होती. ही योजना शासनाकडे सादर करतेवेळी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण सातारा विभागाकडून चुकीचा सर्व्हे झाल्यामुळे मंजूर योजनेमध्ये वितरण व्यवस्थेसाठी पाईपलाईन कमी पडत होती. तसेच कप्हेर येथील लोडशेडीगमुळे आवश्यक तितके पंपींग होउ शकत नव्हते. त्यासाठी आवश्यक असणारी एक्स्प्रेस एम.एस.ई.बी लाईन व वाढीव पाईपलाईन या सर्व बाबींचा व्यवस्थित विचार करुन शाहूपुरी ग्रामपंचायतीच्या सत्तारुढ काळभेरव पॅनेल ने वाढीव योजना मंजूर करण्यासाठी आग्रही भुमिका घेत पंचायत समितीचे माजी उपसभापती श्री संजय पाटील यांच्या माथ्यमातून सर्व कागदपत्रांची पूर्तता करुन वाढीव योजना महाराष्ट्र जीवन प्राधिकरण मार्फत शासनाकडे सादर केली
होती. या वाढीव योजनेस आज शासनाने निधी उपलब्ध करुन दिल्यामुळे शाहूपुरीवासीयांच्या जिव्हाळयाचा पाणीपुरवठयाचा प्रश्न सोडविल्याबददल नागरिकांकडून समाधान व्यक्त होत आहे. तसेच यासाठी श्री संजय पाटील यांनी केलेल्या विशेष प्रयत्नाबददल सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.