प्राथमिक शिक्षक समितीने वेधले जिल्हाधिकाऱयांचे लक्ष : तातडीने आदेश देण्याची मागणी
प्रतिनिधी / ओरोस:
कोविड कक्षात व्यवस्थापकाचे कर्तव्य निभावणाऱया शिक्षकांना त्यांच्या सेवा या कामासाठी अधिग्रहित केल्याचे व्यक्तिगत आदेश देण्यास प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीने केला आहे. मालवण व कणकवली तालुके वगळता अन्य तालुक्यात केंद्रप्रमुखांनी आदेश दिले आहेत. मात्र, केंद्रप्रमुखाना कार्यासनाचे अधिकार नसल्याने त्यांच्या आदेशाने काम करण्यात जोखीम असल्याचा मुद्दा जिल्हाधिकारी यांच्या निदर्शनास आणून देत सर्व शिक्षकांना त्यांच्या सेवा कोविडसाठी अधिग्रहित केल्याचे गटविकास अधिकाऱयांच्या सहीचे व्यक्तिगत आदेश देण्यात यावेत, अशी मागणी केली आहे.
कोरोना प्रादुर्भाव व संक्रमण रोखण्यासाठी आपत्ती निवारण योजनेंतर्गत, गावागावातील प्राथमिक व माध्यमिक शाळांच्या मुख्याध्यापक, शिक्षकांना संस्थात्मक विलगीकरण कक्षाचे व्यवस्थापक म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. अशा प्रकारच्या आपत्ती व्यवस्थापन कर्तव्यासाठी तैनात केल्या जाणाऱया कर्मचाऱयांना त्यांच्या सेवा अधिग्रहित करणे अगर सेवा वर्ग केल्याबद्दल संबंधितांना सक्षम प्राधिकाऱयाचे व्यक्तिगत आदेश बजावणे आवश्यक असते. मात्र, मालवण व कणकवली हे दोन तालुके वगळता उर्वरित तालुक्मयातील शिक्षकांना नेमणुकीचे सक्षम प्राधिकाऱयांचे व्यक्तिगत आदेश अद्याप देण्यात आलेले नाहीत.
दरम्यान, प्राथमिक शिक्षणाधिकाऱयांनी संबंधित शिक्षकांना केंद्रप्रमुखांनी व्यक्तिगत आदेश द्यावेत, असे आदेश 18 मे रोजी दिले आहेत. त्यानुसार केंद्रप्रमुखांनी 2 जून रोजी आपापल्या कार्यबल गटातील शिक्षकांना व्यक्तिगत आदेश बजावलेले आहेत. मात्र, केंद्रप्रमुख हे अध्यापन क्षेत्रातील पर्यवेक्षकीय यंत्रणेचे घटक असून त्यांना कार्यासनाचे कोणतेही अधिकार नाहीत. त्यामुळे ते कोणाही शिक्षकांच्या सेवा अधिग्रहित किंवा वर्ग करू शकत नाहीत, ही बाब जिल्हाधिकारी यांच्या निदर्शनास आणून देण्यात आली.
सेवा बजावत असल्याचे सिद्ध होणे आवश्यक
कोविडसाठी कर्तव्य बजावत असताना कर्मचाऱयांच्या जिवीतास धोका निर्माण झाला तर संरक्षक कवच म्हणून 30 सप्टेंबर 2020 पर्यंतच्या अंतरिम मुदतीची विमा योजना शासनाने लागू केली आहे. दुर्दैवाने आपत्ती व्यवस्थापनाचे हे कर्तव्य बजावणाऱया एखाद्या शिक्षकाच्या जिवीतास धोका निर्माण झाल्यास, संबंधित शिक्षकांच्या कुटुंबियांना शासनाच्या विमा योजनेचा लाभ मिळण्यासाठी, तो कर्मचारी कोविड 19 च्या अनुषंगाने सेवा बजावत होता, हे सिद्ध होणे आवश्यक आहे. त्यावेळी त्याची सेवा अधिग्रहित किंवा वर्ग केल्याचे सक्षम प्राधिकाऱयाचे व्यक्तिगत आदेशपत्र कुटुंबियांना सादर करावे लागणार आहे. या बाबीकडे लक्ष वेधण्यात आले.
लाभ मिळण्यास भविष्यात अडचणी
सद्यस्थितीत अनेक ठिकाणी संस्थात्मक विलगिकरण केंद्रामध्ये असलेल्या व्यक्तींना कोविड 19 चा प्रादुर्भाव झाल्याची उदाहरणे आहेत. अशा ठिकाणी विलगिकरण कक्षाचे व्यवस्थापक म्हणून डय़ुटी बजावणाऱया शिक्षकांनासुद्धा कोविड 19 च्या प्रादुर्भावाचा धोका पोहोचण्याचा संभव नाकारता येत नाही. दुर्दैवाने तसे झाल्यास, विमा योजनेचा लाभ मिळण्यात भविष्यात अडचणी येणार आहेत. याबाबतचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी यांच्याकडे सादर करण्यात आले असल्याची माहिती शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष नितीन कदम यांनी दिली. यावेळी जिल्हा सरचिटणीस सचिन मदने, राज्य सहसचिव नामदेव जांभवडेकर, जिल्हा उपाध्यक्ष चंद्रसेन पाताडे, जिल्हा कोषाध्यक्ष लहू दहिफळे, संघटक श्यामराव बिरादार आदी उपस्थित होते.