रुग्ण अन् प्रशासन यांच्यातील दुवा
प्रशासकीय अधिकारी म्हणून कार्यरत
दत्तप्रसाद पेडणेकर / मसुरे:
देवगड तालुक्मयातील खुडी गावात सासर असलेली व आरोग्य सेवेशी संबंधित असलेली सिंधुदुर्गची रणरागिणी मुंबईत नायर या कोरोना स्पेशल रुग्णालयात रुग्णांची सेवा करण्यात आणि प्रशासकीय काम करण्यात आघाडीवर आहे.
नायर या कोरोना स्पेशल रुग्णालयात खुडी गावच्या शरयू रमेश आईर प्रशासकीय अधिकारी म्हणून सेवा बजावत आहेत. हे रुग्णालय कोरोना रुग्णालय म्हणून जाहीर होताच शरयू आईर यांनी रुग्णसेवा व प्रशासकीय कामकाजात आपल्याला पूर्णपणे वाहून घेतले आहे. कधी-कधी 48 तास ही गरज ओळखून न डगमगता, न घाबरता रुग्ण सेवेत शरयू यांनी चांगल्या पद्धतीने सेवा बजावली आहे. त्या गेली 34 वर्षे महापालिका सेवेत कार्यरत असून दीड वर्षापूर्वी त्यांची नायर रुग्णालयात प्रशासकीय अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली होती.
रुग्णसेवा म्हणजे देशसेवा!
सुरुवातीला शरयू काहीशा द्विधा मन:स्थितीत होत्या. या महामारीत रुग्ण कसे येतील, कोणत्या पद्धतीने येतील आणि ते केव्हा बरे होतील, याबाबत ठोस काही समजत नव्हते. पण शरयू डगमगल्या नाहीत. रुग्णांची सेवा म्हणजेच देशसेवा असे समजून शरयू यांनी कामकाज करण्यास सुरुवात केली. तासातासाने रुग्णालयाची सर्व माहिती अपडेट करणे, अधिकारी, पदाधिकाऱयांना माहिती पुरविणे यासह शरयू फिल्डवर जात असल्याने त्यातील आवश्यक रुग्ण सेवेतील बारकावे त्या वरि÷ांना समजाऊन देत असल्याने रुग्णांना सेवा देताना या रुग्णालयाला सोपे पडत होते. रुग्ण आणि अधिकारी प्रशासन यातील त्या दुवा ठरत आहेत.
प्रशासकीय कामकाज अन् रुग्ण सेवाही
शरयू म्हणाल्या, सुरुवातीला रुग्णालयाच्या आवारातही जाताना प्रचंड ताण व भीती वाटायची. संध्याकाळी घरी गेल्यावर सुद्धा कुटुंबात जाताना मनात भीती असायची. परंतु रुग्णालयाचे डीन यांनी वेळोवेळी धीर देऊन प्रोत्साहन दिल्याने आणि पती रमेश आईर यांनी आत्मविश्वास दिल्याने आपण या रुग्णालयात प्रशासकीय कामकाज व रुग्णसेवा असे दुहेरी काम यशस्वीरित्या करत आहे.
रुग्णांचे मनोधैर्य वाढविणे गरजेचे
नवीन रुग्ण घाबरलेले असायचे परंतु आम्ही सर्वजण त्यांचे मनोधैर्य वाढवत होतो. तेच रुग्ण बरे होऊन जाताना मात्र त्यांच्या चेहऱयावरील आनंदाश्रू पाहताना मन भरून येते. सुरुवातीच्या काळात त्यांची काम करण्याची स्थिती ‘करो या मरो’ अशीच होती. पण शरयू कधी डगमगल्या नाहीत. त्या काम करताना स्वतः पुढे राहिल्या आणि आपल्या सोबत सर्व कर्मचाऱयांना धीर देत प्रोत्साहित केले. सुरक्षाविषयक खबरदारी घेऊन त्यांनी काम केले. आपले राहते, घर बोरिवली ते नायर रुग्णालय हा मोठा प्रवासही रोज करताना त्या कधी डगमगल्या नाहीत.
वरिष्ठांकडूनही त्यांच्या कामाचे कौतुक कामाच्या गडबडीत घरच्यांचा विसर पडू लागला. अनेक दिवस मुलांमध्येही जाता आले नाही. अनेक रुग्णांना आर्थिक मदतीचा हातही त्यांनी पुढे केला. या काळात त्यांनी नायर आणि कोरोना रुग्ण सेवा हेच आपले घर मानले आहे. वरि÷ अधिकाऱयांनीही त्यांच्या कामाचे कौतुक केले आहे.