दोघे पती पत्नी जिल्हा परिषद शिक्षक
प्रतिनिधी / सोलापूर
शिक्षक पतीने शिक्षक पत्नीच्या डोक्यात दगडी वरवंटा मारून ठार केले असल्याची नोंद सिव्हील पोलीस चौकीत झाली आहे. अर्चना विकास हरवाळकर(वय 35 रा,गीता अपार्टमेंट,बँक ऑफ इंडिया कॉलनी,जुळे सोलापूर) असे मृत महिलेचे नाव आहे. तर विकास विश्वनाथ हरवाळकर(वय 37 रा,गीता अपार्टमेंट,बँक ऑफ इंडिया कॉलनी) असे संशयीत आरोपी पतीचे नाव आहे.
शेअर बाजारात झालेल्या कर्जाला कंटाळून खून झाला असल्याची प्राथमिक माहिती आहे. याबाबत विजापूर नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होण्याची प्रक्रिया सुरू आहे.खून का झाला ? किंवा खुनाचे नेमके कारण काय ? याचा सर्व तपशील पोलीस तपासानंतर समोर येईल.
दोघे जिल्हा परिषद शिक्षक
मृत पत्नी अर्चना या आज सोमवारी सकाळी पती विकास याने दगडी वरवंटा डोक्यात मारून खून केला. कर्ज प्रकरणातून ही घटना घडली असल्याची माहिती समोर येत आहे. दोघे पती पत्नी जिल्हा परिषद मध्ये शिक्षक आहेत .या दाम्पत्यास वेदांत हा दहा वर्षीय मुलगा देखील आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.