वार्ताहर / कुंभोज
कुंभोज तालुका हातकणंगले येथील कुंभोजचा अविभाज्य घटक शाहूनगर हा परिसर असून सदर परिसर गेली कित्येक वर्षे अनेक विकास कामापासून वंचित असून सदर परिसराकडे कोणी लोकप्रतिनिधी लक्ष देणार की नाही ?
परिणामी सदर परिसरातील रस्ते व गटस हा महत्त्वाचा प्रलंबित प्रश्न असून, सदर परिसरातील रस्त्यावरून वाहतूक करत असताना नागरिकांना तारेवरची कसरत करावी लागते, पण गट्टरचा पत्ता नसल्याने पाणी कुठन निघते व कोठे थांबते हे परिसरातील नागरिकांना माहिती नसून, जागोजागी तुंबलेल्या व साठलेल्या पाण्यामुळे सदर परिसरात मोठ्या प्रमाणात रोगराई पसरत आहे. परिणामी गेले कित्येक वर्ष सदर परिसरातील नागरिकांनी अनेक लोकप्रतिनिधी यांच्याकडे सदर परिसराच्या विकासासाठी बऱ्याच वेळा मागणी करूनही सदर परिसराकडे केवळ लोकप्रतिनिधी व ग्रामपंचायत कुंभोज यांचे दुर्लक्ष झाले आहे.
परिणामी आम्हीसुद्धा कुंभोजचा एक घटक असून कुंभोज ग्रामपंचायतीने आमच्या विकासाकडे ही लक्ष द्यावे, परिसरातील समस्या दिवसेंदिवस वाढत असून रस्ते गटर व अन्य प्रलंबित प्रश्नांमुळे नागरिकात लोकशाहीबद्दल तिरस्कार निर्माण झाला आहे. परिणामी शाहूनगर येथील जमीर बारगीर घर ते स्टार चिकन दुकानापर्यंत रस्ता व गटर्स अद्याप अपूर्ण आहेत. सदर गटारीचे पाणी जमीर बारगीर व दस्तगीर मुल्ला यांच्या घराच्या शेजारी साठ्यात आहे. त्यामुळे अनेक आरोग्याचे प्रश्न निर्माण झाले असून, सदर रस्ता व गटस लवकरात लवकर पूर्ण व्हावी अशी मागणी आज शिवाजीनगर परिसरातील नागरिकांनी ग्रामपंचायतचे ग्रामविकास अधिकारी ए एस कठारे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
यावेळी परिसरातील नागरिकांनी रस्ते व गटर्स बाबत आपल्या तीव्र भावना ग्रामपंचायत कुंभोज येथे ग्रामविकास अधिकारी यांच्यासमोर व्यक्त केल्या परिणामी ग्रामपंचायत व शासकीय योजनेतून सदर परिसराचा विकास करण्यासाठी आपण बांधील आहोत, सदर परिसरातील अपूर्ण कामांची लवकरात लवकर माहिती घेऊन ती पूर्ण करण्यासाठी शासन दरबारी आपण प्रयत्न करू असे आश्वासन ग्रामविकास अधिकारी ए. एस. कठारे यांनी उपस्थित नागरिकांना दिले. यावेळी सुरेश भगत, माजी उपसरपंच बाळासाहेब डोणे,दस्तगीर मुल्ला ,सुरज मुल्ला, रमजान बक्सार, सरदार पटेल, इक्बाल मुजावर, लखन माने, शाहूनगर परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.