कॉमनवेल्थ विद्यापीठाची मिळाली पीएचडी
प्रतिनिधी / कोल्हापूर
कुशल नेतृत्वाच्या जोरावर शैक्षणिक प्रशासनात सुसूत्रता आणून गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा ध्यास घेणारे कोल्हापूर जिल्हा परिषदेचे माध्यमिक शिक्षणाधिकारी किरण लोहार यांना कॉमनवेल्थ व्होकेशनल विद्यापीठ, किंगडम ऑफ टोंगा यांच्यावतीने शिक्षण क्षेत्रातील अनुभव व उल्लेखनीय कार्याची नोंद घेऊन शिक्षणशास्त्र विषयातील पीएच.डी. पदवी दिल्ली येथे झालेल्या समारंभात कॉमनवेल्थ व्होकेशनल विद्यापीठाचे संस्थापक सदस्य राकेश मित्तल आणि प्र.कुलगुरू रिपू राजन सिन्हा यांच्या हस्ते प्रदान करण्यात आली. या प्रसंगी सि.ई.डी. फौंडेशन चे अध्यक्ष प्रियदर्शी नायक आणि पॅलेस्टीनी दूतावासाचे मिडिया ऍडव्हायझर अब्दुल अल रझाक अबू झुबेर हे उपस्थित होते.
शिक्षणाधिकारी लोहार शैक्षणिक क्षेत्रात प्रशासक आणि अधिकारी म्हणून सन 2013 पासून सक्षमपणे कार्यभार सांभाळत आहेत. रत्नागिरी जिल्हा परिषदेचे माध्यमिक शिक्षणाधिकारी, कोकण विभागीय मंडळाचे विभागीय सचिव, कोल्हापूर विभागाचे शिक्षण उपसंचालक आणि जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षणाधिकारी म्हणून अतिरिक्त कार्यभार अशी प्रशासकीय पदे सांभाळली आहेत. ऑगस्ट 2018 पासून जिल्हा परिषद कोल्हापूर येथे माध्यमिक शिक्षणाधिकारी म्हणून ते सक्षमपणे कार्यरत असून कोल्हापूर जिल्हातील शैक्षणिक क्षेत्रात विविध उपक्रम व योजना यांची प्रभावी अंमलबजावणी करत आहेत. त्यांनी संघटन चातुर्याच्या जोरावर लोकसहभागातून ‘जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शन’ आणि ‘जिल्हास्तरीय स्काऊट-गाईड शिबिराचे आयोजन आणि संचलन यशस्वीपणे केले आहे. कोल्हापूर जिल्यातील 1000 हून अधिक मुख्याध्यापकांसाठी तालूकानिहाय सहविचार सभांचे आयोजन करून प्रशासकीय कामाच्या प्रभावी अंमलबजावणीचे प्रशिक्षण दिले आहे.
त्यांच्या प्रयत्नाने गेल्या काही वर्षातील सर्व प्रकारच्या शिष्यवृत्ती योजनेची प्रलंबित रक्कम युद्धपातळीवर काम करून लाभार्थी विद्यार्थीपर्यंत पोहचविली आहे .अप्रगत विद्यार्थीसाठी जलदगती अध्ययन प्रोग्राम पूर्ण क्षमतेने शिक्षकांनी राबवावा आणि विद्यार्थी गुणवत्तापूर्ण घडावा यासाठी मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख, शिक्षकांना प्रोत्साहन व मार्गदर्शन केले आहे.` प्रत्येक बालकाला गुणवत्तापूर्ण शिक्षण हा ध्यास होऊन प्रशासकीय यंत्रणा, संस्थाचालक, केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक , शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी या सर्वाचा उत्तमोत्तम सहभाग घेत ‘ज्ञानगंगा घरोघरी’ पोहचविण्याचा प्रामाणिक प्रयत्न त्यांनी केला आहे.
त्यांच्या कार्याची आणि धाडसी सेवेची आणि लोकप्रियतेची नोंद घेऊन अखिल महाराष्ट्र शिक्षक सेवा राजपत्रित अधिकारी संघ, महाराष्ट्र राज्य, पुणे च्या उपाध्यक्षपदी निवड झाली . त्यांच्या कार्याच्या गौरवार्थ महाराष्ट्र जर्नलिस्ट फौंडेशनचा राष्ट्रीय स्तरावरील भास्कर'- दि प्राईड ऑफ इंडिया' , डॉ. सुजित मिणचेकर फाऊंडेशन या शिक्षणरत्न पुरस्कार, स्काऊट चळवळीतील मानाचा ' बार टू मेडल ऑफ मेरीट ' पुरस्कार, आविष्कार फाउंडेशन चा राज्यस्तरीय सक्षम अधिकारी पुरस्कार असे अनेक पुरस्कार प्रदान करणेत आले आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोरोना संक्रमण रोखणेकामी प्रबोधन कार्यात सक्रीय सहभाग नोंदवले बद्दल त्यांना अनेक संस्थांनी
कोरोना योद्धा’ पुरस्काराने गौरवले आहे.